५ हजार ५७५ कोटींची मालमत्ता कर वसुली, ५०० चौ. फुटांपर्यंतच्या मालमत्तांना सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 01:56 PM2023-04-02T13:56:15+5:302023-04-02T13:56:34+5:30

मालमत्ता विभाग हा मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत

5 thousand 575 crore property tax collection, 500 sq. Exemption for properties up to feet | ५ हजार ५७५ कोटींची मालमत्ता कर वसुली, ५०० चौ. फुटांपर्यंतच्या मालमत्तांना सूट

५ हजार ५७५ कोटींची मालमत्ता कर वसुली, ५०० चौ. फुटांपर्यंतच्या मालमत्तांना सूट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता विभागाने गेल्या आर्थिक वर्षात ५ हजार ५७५ कोटी ४४ लाख रुपये कर वसूल केला आहे. ४ हजार ८०० कोटींच्या निर्धारित लक्ष्याच्या तुलनेत ७७५ कोटी रुपये म्हणजेच १६.१४ टक्के अधिक कर संकलन करण्यात करनिर्धारण व संकलन खात्याला यश आले आहे.

मुंबईकरांना महापालिकेद्वारे विविध नागरी सेवा सुविधा पुरविल्या जातात. या अनुषंगाने ‘मालमत्ता कर’ हा मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे.  ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली ही ५ हजार ५७५ कोटी ४४ लाख रुपये झाली आहे, अशी माहिती सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे आणि सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) महेश पाटील यांनी दिली आहे. योग्य नियोजन व परिणामकारक अंमलबजावणीमुळे  ४ हजार ८०० कोटींपेक्षा साडेसातशे कोटी रुपये अधिक मालमत्ता कर संकलित झाला आहे.

५०० चौ. फुटांपर्यंतच्या मालमत्तांना सूट

- मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट दिली आहे.
- १ जानेवारी २०२२ रोजी हा निर्णय घेण्यात आला. 
- एकूण १६ लाख १४ हजार निवासी सदनिकाधारकांना त्याचा लाभ झाला आहे.

Web Title: 5 thousand 575 crore property tax collection, 500 sq. Exemption for properties up to feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.