मुंबई : राज्यात मंगळवारी ५ हजार ६०९ कोरोना रुग्ण आणि १३७ मृत्यूंची नोंद झाली आहे तर दिवसभरात ७ हजार ७२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ६१ लाख ५९ हजार ६७६ रुग्णांनी कोविडवर मात केली. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८ टक्के झाले असून, सध्या ६६ हजार १२३ रुग्ण उपचाराधीन आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ९९ लाख ५ हजार ९६ प्रयोगाशाळा नमुन्यांपैकी १२.७५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख १३ हजार ४३७ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून, २ हजार ८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ६३ हजार ४४२ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ३४ हजार २०१ झाला आहे. सध्या पुण्यात १३ हजार ८९२, सांगलीत ७ हजार २९७, साताऱ्यात ६ हजार ४६९, कोल्हापूरमध्ये ४ हजार ५९७, मुंबईत ४ हजार ५०१, ठाण्यात ६ हजार ७० रुग्ण उपचाराधीन आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या १३७ मृत्यूंमध्ये मुंबई ५, ठाणे १, नवी मुंबई मनपा ३, वसई विरार मनपा ४, रायगड ४, पनवेल मनपा २, नाशिक १, अहमदनगर ८, जळगाव १, जळगाव १, पुणे ६, पुणे मनपा ५, पिंपरी चिंचवड मनपा ५, सोलापूर १८, सोलापूर मनपा २, सातारा १०, कोल्हापूर १०, कोल्हापूर मनपा २, सांगली १७, सांगली मिरज कुपवाड मनपा ४, सिंधुदुर्ग ६, रत्नागिरी ४, औरंगाबाद ६, औरंगाबाद मनपा २, लातूर मनपा १, उस्मानाबाद १, बीड ३, यवतमाळ १, बुलडाणा ३ आणि चंद्रपूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे.