मुंबईत ५ हजार ७९९ रुग्ण उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:17+5:302021-07-25T04:06:17+5:30
दैनंदिन मृत्यू एक अंकावर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे, तर रुग्ण ...
दैनंदिन मृत्यू एक अंकावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा दर १ हजार २४१ दिवसांवर आला आहे. १७ ते २३ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे. शनिवारी दिवसभरात ६११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ७ लाख ९ हजार ८०९ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे.
उपचाराधीन रुग्णांपैकी ५५७ रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत, तर २ हजार ७६५ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, २ हजार ४५७ रुग्ण लक्षणविरहित आहेत. मुंबईत शनिवारी ४१३ रुग्णांचे निदान झाले, तर ९ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ३३ हजार ७५७ असून, मृतांची संख्या १५ हजार ७६६ आहे.
दिवसभरात ३५ हजार २१ चाचण्या झाल्या असून, आतापर्यंत एकूण ७९ लाख ३३ हजार ७२९ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. शहर उपनगरात चाळ व झोपडपट्ट्यांच्या परिसरात केवळ तीन सक्रिय कंटेन्मेंट झोन्स असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६२ आहे. मागील २४ तासांत रुग्णांच्या संपर्कातील ३ हजार २१७ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे.