मुंबईत ५ हजार ८९७ रुग्ण उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:35+5:302021-07-23T04:06:35+5:30
मुंबई : मुंबईत गुरुवारी दिवसभरात ३९२ रुग्णांची, तर १० मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून, ...
मुंबई : मुंबईत गुरुवारी दिवसभरात ३९२ रुग्णांची, तर १० मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून, ११५२ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या ५ हजार ८९७ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत पुन्हा एकदा रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. दिवसभरात ५०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ७ लाख ८ हजार ७१६ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
शहर उपनगरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ३२ हजार ७४१वर पोहोचला आहे, मृतांचा एकूण आकडा १५ हजार ७४९वर पोहोचला आहे.
१५ ते २१ जुलैदरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या पाच चाळी आणि झोपडपट्ट्या कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, तर ६२ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत.
कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ३० हजार ५०९, तर आतापर्यंत एकूण ७८ लाख ७१ हजार ५७७ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.