सर्वसामान्यांसाठी म्हाडा बांधणार पाच हजार घरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 02:51 AM2018-04-01T02:51:31+5:302018-04-01T02:51:31+5:30

सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणाºया म्हाडाने नागरिकांना खुशखबर दिली आहे. म्हाडा येत्या ३१ मे रोजी तब्बल ५ हजार घरांची लॉटरी काढणार आहे. घरांच्या लॉटरीचा कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ३१ मे रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

 5 thousand houses to construct MHADA for common people | सर्वसामान्यांसाठी म्हाडा बांधणार पाच हजार घरे!

सर्वसामान्यांसाठी म्हाडा बांधणार पाच हजार घरे!

Next

मुंबई : सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणाºया म्हाडाने नागरिकांना खुशखबर दिली आहे. म्हाडा येत्या ३१ मे रोजी तब्बल ५ हजार घरांची लॉटरी काढणार आहे. घरांच्या लॉटरीचा कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ३१ मे रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ हजार घरांमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३ हजार घरे, अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार घरे, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी प्रत्येकी ५०० घरे, अत्यल्प गटासाठी चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, मालाड-मालवणी आणि कुर्ला येथे, तर अल्प उत्पन्न गटासाठी घाटकोपर, भांडुप, दहिसर येथे घरे असणार आहेत. मध्यम गटासाठी मुलुंड आणि बोरीवली येथे घरे बांधण्यात येतील. उच्च उत्पन्न गटासाठी सायन आणि वरळी येथे घरे असणार आहेत.
यंदाच्या लॉटरीतील घरांच्या किमती परवडणाºया असतील, असा दावा म्हाडाने केला असला, तरी प्रत्यक्षात सायन, वरळी, बोरीवली येथील घरांच्या किमती तब्बल कोटींच्या घरात आहेत. लॉटरीमधील काही घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, काही घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. दरम्यान, लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी घरांच्या किमती कमी-जास्त करण्यावरून प्राधिकरणामध्ये संभ्रमावस्था असून, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरांच्या किमती ठरविल्या जाणार आहेत. 

   वाचकहो, थोडा धक्का बसला ना, बातमी वाचून. नेहमीच ‘सिरिअसली’ बातम्या वाचणाऱ्या वाचकांना हा गोड धक्का देण्याचा छोटासा प्रयत्न. निमित्त अर्थातच आजच्या ‘एप्रिल फूल’ चे. डोण्ड टेक इट सिरिअसली...

Web Title:  5 thousand houses to construct MHADA for common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.