५ हजार विद्यार्थी करणार गेट वे आॅफ इंडियावर योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:16 AM2018-06-19T02:16:38+5:302018-06-19T02:16:38+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी पतंजली योगपीठाने सकाळी ६ वाजता योग शिबिराचे आयोजन केले आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी पतंजली योगपीठाने सकाळी ६ वाजता योग शिबिराचे आयोजन केले आहे. गेट वे आॅफ इंडिया येथे पार पडणाऱ्या या शिबिरात मुंबईतील तब्बल ५ हजार विद्यार्थी सामील होतील, असा दावा आयोजकांनी आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीने ही माहिती दिली. पतंजलीमार्फत देशातील २० हजार तरुणांना योगाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची
माहिती भारत स्वाभिमान ट्रस्टचे राज्य प्रभारी सुरेश यादव यांनी या वेळी दिली. यादव म्हणाले की, तरुणांना स्वावलंबित करण्यासाठी २३ ते २७ जून दरम्यान युवा स्वावलंबन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर, डोंबिवली, भिवंडी येथे शिबिरे पार पडतील.
दरम्यान, गेट वे आॅफ इंडिया येथील योग शिबिरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आमंत्रित केल्याचे समितीने सांगितले.