चला, प्रवाशांनो पुढे या! ३१ डिसेंबरला बेस्टच्या ५० अतिरिक्त बस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 10:02 AM2022-12-30T10:02:14+5:302022-12-30T10:03:50+5:30

थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन तसेच नववर्षाचे स्वागत करताना मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी बेस्ट उपक्रमाने घेतली आहे.

50 additional buses of best on 31st december | चला, प्रवाशांनो पुढे या! ३१ डिसेंबरला बेस्टच्या ५० अतिरिक्त बस

चला, प्रवाशांनो पुढे या! ३१ डिसेंबरला बेस्टच्या ५० अतिरिक्त बस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन तसेच नववर्षाचे स्वागत करताना मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी बेस्ट उपक्रमाने घेतली आहे. शनिवारी रात्री मुंबईकरांना बेस्ट बसमधून प्रवास करता यावा म्हणून प्रशासनाने ५० अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या बसमधून समुद्रकिनाऱ्याची सफर मुंबईकरांना करता येणार आहे.

प्रवाशांना दिवसरात्र सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाद्वारे सण, उत्सवानिमित्त जादा बसेस चालवल्या जातात. शनिवारी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी तसेच  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर घराबाहेर पडतात. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बसेस चालवल्या जाणार आहेत. 
श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, अंधेरी पश्चिम, सांताक्रुझ पश्चिम, बोरिवली स्थानक पश्चिम दरम्यान गोराई बीच, मालाड पश्चिम या मार्गावर अतिरिक्त बसेस चालवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या चार विशेष गाड्या! 

मध्य रेल्वेने ३१ डिसेंबर रोजी रात्री जादा लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दोन सीएसएमटी ते कल्याण आणि दोन सीएसएमटी ते पनवेल अशा चार विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य मार्गावर सीएसएमटी येथून विशेष ट्रेन मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे मध्य रात्री ०३.०० वाजता पोहोचेल. कल्याण येथून मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे मध्य रात्री ३ वाजता पोहोचेल. हार्बर मार्गावरील सीएसएमटी पनवेल लोकलही सीएसएमटी येथून मध्यरात्री १.३० वाजता सुटेल आणि मध्य रात्री २.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल. पनवेल येथून विशेष लोकल मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे मध्य रात्री २.५० वाजता पोहोचेल. या सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 50 additional buses of best on 31st december

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट