Join us

मुंबईतून 63 विमान उड्डाणे रद्द, इंडिगो, स्पाईस जेट प्रवाशांना तिकीटाची सर्व रक्कम करणार परत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 1:53 PM

मुंबईत कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि मुख्य धावपट्टी बंद असल्याने हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

ठळक मुद्दे20 सप्टेंबरचे तिकीट बुक करणा-या सर्व प्रवाशांना तिकीटाची संपूर्ण रक्कम 100 टक्के पैसे परत करण्यात येतील

मुंबई, दि. 20 - मुंबईत कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि मुख्य धावपट्टी बंद असल्याने हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हवाई सेवेचे वेळापत्रक कोलमडले असून, सर्व प्रवाशांना एसएमएस, फोन, ई-मेलच्या माध्यमातून बदललेल्या वेळेची माहिती देण्यात येत असल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले. 

20 सप्टेंबरचे मुंबईतून किंवा मुंबईत येणा-या इंडिगो विमानाचे तिकीट बुक करणा-या सर्व प्रवाशांना तिकीटाची संपूर्ण रक्कम 100 टक्के पैसे परत करण्यात येतील तसेच प्रवाशांना तिकीटाची तारीख बदलून हवी असेल तर कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले. प्रवासी ऑनलाइनही त्यांचे तिकीट रद्द करु शकतात असे इंडिगोकडून सांगण्यात आले. 

इंडिगोप्रमाणेच स्पाईस जेटनेही मुंबईतून किंवा मुंबईत येणा-या  स्पाईस जेटच्या विमानाचे 20 सप्टेंबरचे तिकिट बुक करणा-या प्रवाशांना तिकीटाची सर्व रक्कम परत करणार असल्याचे सांगितले आहे. स्पाईस जेटही तिकीट रद्द करणे किंवा तारीख बदलण्यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. 

मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुख्य रनवे बंद आहे. संध्याकाळी पाचवाजेपर्यंत एकूण 63 विमान उड्डाणे रद्द झाल्याची माहिती आहे.  रनवे 14 वर धीम्या गतीने विमानाचे उड्डाण आणि लँडिंग सुरु आहे. 

टॅग्स :विमानतळ