जगभरातील ५० % रुग्ण; ३० % मृत्यू भारतात, युपी-बिहारमध्ये वाढले रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 06:17 AM2021-05-03T06:17:04+5:302021-05-03T06:17:26+5:30

बिहार, उत्तर प्रदेशात रुग्णवाढीचे प्रमाण अधिक

50% of patients worldwide; 30% of deaths in India | जगभरातील ५० % रुग्ण; ३० % मृत्यू भारतात, युपी-बिहारमध्ये वाढले रुग्ण

जगभरातील ५० % रुग्ण; ३० % मृत्यू भारतात, युपी-बिहारमध्ये वाढले रुग्ण

Next

डाॅ. खुशालचंद बाहेती

मुंबई : १ मे रोजी जगभरात आढळून आलेल्या रुग्णांत भारताचा वाटा ५० टक्केच्या जवळ तर मृत्यूमध्ये ३० टक्के वाटा होता. ऑर्गनाईज्ड मेडिसीन अकॅडेमिक गील्ड (ओमॅग) या संस्थेने केलेल्या अभ्यासात हे निष्पन्न झाले आहे. तरीही एकूण रुग्ण संख्येत २२० देशात भारत ११४ वा तर मृत्यूमध्ये ११७ वा आहे. ओमॅगचे महासचिव डाॅ. ईश्वर गिल्डा यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालाप्रमाणे १० मार्चच्या तुलनेत रुग्ण वाढीचे प्रमाण सर्वाधिक बिहार (३१३ पट), उत्तरप्रदेश (२५०  पट), आसाम (१५७ पट), उत्तराखंड (१५२ पट), ओडिशा (१५० पट) असे आहे.
 

प्रति दशलक्ष संसर्गात महाराष्ट्राचा सातवा क्रमांक

n१ मे रोजी जगभरातील कोरोना बाधित ७ लक्ष ९५ हजार ८१९- भारत ३ लक्ष ९२ हजार ५६२ (जगाच्या ४९.३२%) 

n१ मे रोजी मृत्यू : जगभरात १२८८२, भारत ३६८८ (२८.६२%) 

n महाराष्ट्रात सर्वाधिक केसेस असल्या तरीही प्रति दशलक्ष संसर्गात ७ वा क्रमांक. गोवा, दिल्ली, लडाख, केरळ, लक्षद्विप, पाँडेचेरी यांचा क्रमांक महाराष्ट्राच्यावर. 

n १ मे रोजी सर्वाधिक प्रति दशलक्ष लोकसंख्या मृत्यू दर देहराडून ४१ प्रती दशलक्ष (देशाचा दर २ प्रती दशलक्ष)

nदेशातील सर्वाधिक प्रति दशलक्ष लोकसंख्या कोविड रुग्णांची नोंद नागपूर, पुणे, गुरुग्राम, बंगळुरू, लेह. 
nप्रति दशलक्ष सर्वाधिक मृत्यू नागपूर, मुंबई, पुणे, डेहराहून, यमन.

Web Title: 50% of patients worldwide; 30% of deaths in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.