५० टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचे आव्हान
By admin | Published: May 26, 2014 04:19 AM2014-05-26T04:19:02+5:302014-05-26T04:19:02+5:30
ठाण्याच्या महापौरांनी केलेल्या पाहणी दौर्यानंतर ५ जूनपर्यंत १०० टक्के नालेसफाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
ठाणे : ठाण्याच्या महापौरांनी केलेल्या पाहणी दौर्यानंतर ५ जूनपर्यंत १०० टक्के नालेसफाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यातच आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाल्याने उर्वरित काम येत्या आठ ते दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. मुंबईनंतर वाढणारे शहर म्हणजे ठाणे. सतत वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या तसेच विकासकामांमुळे ठाण्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. परंतु त्या अनुषंगाने सुविधा मात्र ठाणेकरांना मिळत नाही. प्रत्येक पावसाळ्यात ठाणेकरांना खड्डे, पाणी साचणे, नाले भरून वाहणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे नालेसफाईच्या कामासाठी ४ मेपासून निविदा काढून त्या कामांना सुरुवात झाली. नऊ प्रभाग समित्यांनिहाय ५२ गटात नाले सफाईच्या कामांचे विभाजन केले. प्रत्येक गटात पाच ते सात नाल्यांचा समावेश आहे. त्यानुसार या नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले. या कामांसाठी ३१ मे ची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र, २३ मेपर्यंत केवळ ५० ते ५५ टक्केच नाल्यांची सफाई झाली, तर ४५ टक्के नाल्यांची सफाई बाकी आहे. ती आठ ते दहा दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाचे आहे. (प्रतिनिधी)