कारागृहातील ५० टक्के कैदी तिशी पार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:10 AM2021-08-18T04:10:22+5:302021-08-18T04:10:22+5:30

हत्येच्या गुह्यातील कैद्यांचे प्रमाण अधिक... हत्येच्या गुह्यातील कैद्यांचे प्रमाण अधिक... लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यभरातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांमध्ये ...

50% of the prisoners in the jail crossed 30 ... | कारागृहातील ५० टक्के कैदी तिशी पार...

कारागृहातील ५० टक्के कैदी तिशी पार...

Next

हत्येच्या गुह्यातील कैद्यांचे प्रमाण अधिक...

हत्येच्या गुह्यातील कैद्यांचे प्रमाण अधिक...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यभरातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांमध्ये ५० टक्के कैदी ३० ते ५० वयोगटातील असल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीतून समोर येत आहे. यात, हत्येच्या गुह्यातील कैद्यांचे प्रमाण अधिक आहे.

महाराष्ट्रामध्ये एकूण ४३ कारागृह आहेत. ९ मध्यवर्ती कारागृह, एक महिला ,तर २८ जिल्हा कारागृहांचा समावेश आहे. एनसीआरबीच्या २०१९ च्या अहवालानुसार, कारागृहाची एकूण क्षमता २४ हजार ९५ इतकी असताना, कारागृहात एकूण ३६ हजार ७९८ कैदी आहेत. यात ३५ हजार २२९ पुरुष आणि १ हजार ५६९ महिला कैद्यांचा समावेश आहे. मध्यवर्ती कारागृहाची क्षमता १४ हजार ४९१ असताना त्याच्या दुप्पट म्हणजे २५ हजार ७३१ कैदी या कारागृहामध्ये कोंबण्यात आले आहेत. तर जिल्हा कारागृहातही तीच परिस्थिती असून, ८ हजार ८३० कैदी आहेत.

यापैकी मुंबईत दोन मध्यवर्ती आर्थर रोड आणि भायखळा कारागृह आहे. यात भायखळाच्या महिला कारागृहात २६२ कैद्यांची क्षमता असताना साडे तीनशेहून अधिक महिला कैदी आहेत. या कारागृहामध्ये न्यायाधीन कैद्यांपैकी १८ ते ३० वयोगटातील १२ हजार ३७३ कैदी आहेत. ३० ते ५० मध्ये १२ हजार ९२८, ५० वर्ष आणि त्यापुढील २ हजार २५६ कैदी आहेत. तर दोषी सिद्ध झालेल्या कैद्यांमध्ये १८ ते ३० मध्ये २ हजार ५७७, ३० ते ५० मध्ये ५ हजार ३९३ आणि ५० वर्ष आणि त्यापुढील १ हजार १२६ कैद्यांचा समावेश आहे.

...

महिला कारागृहातही क्षमतेपेक्षा जास्त कैदी...

राज्यभरातील कारागृहामध्ये एकूण १ हजार ५६९ महिला कैदी आहेत. तर भायखळा येथे असलेल्या महिला कारागृहात २६२ कैद्यांची क्षमता असताना साडे तीनशेहून अधिक महिला कैदी आहेत.

....

वयोगटानुसार कैदी

१८ ते ३० वयोगटातील - १४, ९५०

३० ते ५० - १८,३२१

५० वर्ष आणि त्यापुढील - ३, ३८२

.....

१७ हजार कैदी पॅरोलवर बाहेर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात १७ हजार कैद्यांना पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले.

....

मारेकरी अधिक...

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, कारागृहातील एकूण कैद्यांपैकी १२ हजार ५५ कैदी हे हत्येच्या गुह्यांतील आहेत. यापैकी ५ हजार १९० कैदी दोषी सिद्ध होत शिक्षा भोगत आहेत. तर ६ हजार ८६५ जणांवर खटला सुरू आहे.

....

बेरोजगारांंची भर...

यात हाताला कामधंदा नसल्याने गुन्हेगारीची वाट धरलेल्यांंचे प्रमाण अधिक आहेत. यात चोरी, घरफोडीसह क्षुल्लक कारणातून हल्ले, हत्याच्या घटना घडताना दिसत आहेत, त्यामुळे गुन्हेगारामध्ये बेरोजगार कैद्यांचे प्रमाण अधिक आहे.

Web Title: 50% of the prisoners in the jail crossed 30 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.