मुंबई पोलीस दलात ५० ‘सेगवे’ दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 02:41 AM2020-06-12T02:41:33+5:302020-06-12T02:41:41+5:30
गुरुवारी ५० सेगवे पोलीस दलात दाखल झाल्या आहेत
मुंबई : समुद्रकिनारी गस्त घालण्यासाठी गस्ती पथकाच्या दिमतीला मुंबईत ५० सेगवे (सेल्फ बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर) दाखल झाल्या आहेत. यामुळे पोलिसांना अधिक वेगवान गस्त घालणे शक्य होणार आहे. गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मरीन ड्राइव्ह येथे याचे उद्घाटन करण्यात आले. पोलिसांना आता माईक मास्क देण्यात येणार आहे. जेणेकरून या मास्कद्वारे पोलीस नागरिकांना सुरक्षिततेबाबत सूचना देऊ शकणार आहेत.
सेगवे हे एक विद्युत उपकरण असून, त्याची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर किमान सात ते आठ तास त्याचा वापर करता येतो. किलोमीटर वेगाने धावू शकणाऱ्या या सेगवेवर एक व्यक्ती आरामात फिरू शकते, तसेच या उपकरणाच्या दोन्ही चाकांवर दोन बॉक्स लावण्यात आले असून त्यामध्ये वॉकी टॉकीज, डायरी, पाण्याच्या बाटल्या यांसारख्या वस्तू ठेवता येतील. त्यामुळे सेवेमुळे फुटपाथ चौपाट्या अरुंद गल्ल्या आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त घालणे सोपे होणार आहे.
गुरुवारी ५० सेगवे पोलीस दलात दाखल झाल्या आहेत. यातील दहा सेगवे या वरळीसाठी, तर पाच नरिमन पॉइंटसाठी आहेत. त्याचप्रमाणे वांद्रे, जुहू, वर्सोवा या ठिकाणीही हे सेगवे देण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.
पोलिसांना मास्क माईक
पोलिसांच्या मास्कला माईक लावण्यात येणार असून त्याद्वारे लोकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षिततेसंदर्भात सूचना देण्यास मदत होईल़ पब्लिक अॅड्रेस सिस्टीम असलेले अत्याधुनिक ड्रोनही दाखल होणार असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.