मुंबई : सातत्याने वाढत असलेल्या प्रवाशांना सुविधा पुरवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे ५० हिवाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते करमाळी, अजनी-थिवीम, पुणे-मंगळुरू, लोकमान्य टिळक टर्मिनस-थिवीम व सीएसएमटी-नागपूर या मार्गावर या गाड्या चालवण्यात येणार असून या गाड्यांचे आरक्षण ११ डिसेंबरपासून उपलब्ध होईल.मुंबई-करमाळी-मुंबई सुपरफास्ट स्पेशलच्या ६ फेऱ्या चालवण्यात येतील. २० डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत दर मंगळवारी ही गाडी सीएसएमटी येथून पहाटे ५ वाजता सुटेल तर करमाळी येथून या कालावधीत दर मंगळवारी दुपारी २.३० वाजता सुटेल. तर मुंबई-करमाळी-मुंबई विशेष या गाडीच्या १२ फेºया चालवण्यात येतील. २२ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत ही गाडी दर शनिवारी व रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सीएसएमटी येथून सुटेल तर करमाळी येथून दर शनिवारी व रविवारी दुपारी २ वाजता सुटेल.मुंबई-करमाळी-मुंबई विशेष या गाडीच्या ८ फेºया चालवण्यात येतील. ही गाडी सीएसएमटी येथून १७ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान प्रत्येक सोमवारी मध्यरात्री १२.४० वाजता सुटेल, तर करमाळी येथून प्रत्येक सोमवारी दुपारी २ वाजता सुटेल. अजनी-थिवीम-अजनी साप्ताहिक विशेष गाडी याच्या ६ फेºया चालवण्यात येतील. ही गाडी अजनी येथून २४ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत दर सोमवारी सायंकाळी ७.५० वाजता सुटेल तर थिवीम येथून २५ डिसेंबर ते ८ जानेवारी या दरम्यान दर मंगळवारी रात्री ११ वाजता सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-थिवीम-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष या गाडीच्या ६ फेºया चालवण्यात येतील. ही गाडी एलटीटी येथून २१ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत दर शुक्रवारी मध्यरात्री १.१० वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात ही गाडी थिवीम येथून दर शुक्रवारी दुपारी २.२० वाजता सुटेल. सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी साप्ताहिक एसी सुपरफास्ट विशेष या गाडीच्या ६ फेºया चालवण्यात येतील.
मध्य रेल्वे चालविणार ५० हिवाळी विशेष गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 4:48 AM