Join us

राज्यात ५० हजार ६०७ रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:05 AM

मुंबई : राज्यात कोरोनाच्या ४,३४२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात सध्या ...

मुंबई : राज्यात कोरोनाच्या ४,३४२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात सध्या ५०,६०७ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात दिवसभरात ४,७५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ६२,८१,९८५ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४% झाले आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.१२% आहे.

आजपर्यंत तपासलेल्या ५,४३,२७,४६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.९२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,८७,३८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर १,९७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,७३,६७४ झाली आहे, तर मृतांचा आकडा १ लाख ३७ हजार ५५१ इतका आहे.

दिवसभरात नोंद झालेल्या ५५ मृत्यूंमध्ये मुंबई ४, ठाणे २, नवी मुंबई मनपा १, रायगड १, पनवेल मनपा २, नाशिक १, नाशिक मनपा १, अहमदनगर १४, पुणे २, पुणे मनपा २, सोलापूर ४, सातारा ९, कोल्हापूर मनपा १, सांगली ३, सिंधुदुर्ग ३, जालना १, उस्मानाबाद ५, बुलडाणा १ इ. रुग्णांचा समावेश आहे.