रेल्वे तिकीट रद्द करताना गमावले ५० हजार; माजी अधिकाऱ्याला भामट्याने गंडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 10:15 AM2024-01-03T10:15:00+5:302024-01-03T10:15:15+5:30

गुप्तवार्ताच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आरक्षित रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नावाखाली सायबर भामट्याने ५० हजारांचा गंडा घातला.

50 thousand lost on cancellation of railway ticket ex officier was fooled by fraudsters | रेल्वे तिकीट रद्द करताना गमावले ५० हजार; माजी अधिकाऱ्याला भामट्याने गंडवले

रेल्वे तिकीट रद्द करताना गमावले ५० हजार; माजी अधिकाऱ्याला भामट्याने गंडवले

मुंबई : गुप्तवार्ताच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आरक्षित रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नावाखाली सायबर भामट्याने ५० हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. 

भायखळा परिसरात राहणारे ५८ वर्षीय तक्रारदार हे गुप्तवार्ता विभागात अधिकारी पदावर कार्यरत होते. डिसेंबर २०२३ ते आणि त्यांचे सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त असलेले मित्र राजस्थान येथे फिरण्यासाठी जाणार होते. त्यासाठी त्यांनी आजमेर सुपरफास्ट रेल्वेचे तिकीट भायखळा रेल्वेस्थानक येथून आरक्षित केले. 

थर्टीफर्स्टला मित्राची तब्येत अचानक खालावल्याने त्यांनी तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वेच्या संकेतस्थळावर गेले. त्यावर तिकीट रद्द करण्याचा पर्याय शोधला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर त्यांनी गुगलवर संपर्क क्रमांक शोधला. संपर्क साधताच कॉलधारकाने तो आयआरसीटीसी कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. विश्वास ठेवून त्याला तिकीट रद्द करण्याबाबत विचारताच, त्याने पीएनआर क्रमांक मागितला. 

त्यानुसारत्याने प्रवासाची येण्या-जाण्याची बरोबर तारीख सांगितल्याने आणखीन विश्वास बसला आणि ते ऑनलाइन लुटीच्या जाळ्यात अडकले. 

अशा प्रकारे केली लूट :

तिकीट रद्द करण्यासाठी भामट्याने तक्रारदाराकडे क्रेडिट कार्डची माहिती मागितली. त्यानंतर कॉल कट करत व्हॉट्स ॲपवर एक फाइल पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगितले. माहिती भरताच त्यांना बँकेतून कॉल आला. ५० हजार रुपयांचा व्यवहार सुरू असल्याचे समजताच त्यांनी ट्रान्झेक्शन थांबवले. तोपर्यंत ५० हजार रुपये ट्रान्सफर झाले होते. त्यानंतर त्यांनी १९३० वर कॉल करून गुगलवरील बनावट क्रमांकामुळे फसवणूक झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे.

Web Title: 50 thousand lost on cancellation of railway ticket ex officier was fooled by fraudsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.