मुंबई : सध्या सुट्ट्यांमुळे एसटी प्रवाशांनी भरून वाहात आहे. एसटीत उभे राहायला जागा नसूनही अनेकजण बसच्या दारातून आतमध्ये शिरण्यासाठी झुंबड करत असल्याचे चित्र राज्यभरात आहे. मात्र, मुंबईत विभागाला ७० टक्के प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सर्वांना बसायला जागा मिळत आहे. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसटी बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात नाही. कारण बसमध्ये निर्धारित आसनाशिवाय २५ टक्के अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असते. एका बसमध्ये जागा नसेल तर उभे राहून प्रवास करण्याऐवजी प्रवासी थोडया वेळेनंतर दुसऱ्या बसमध्ये बसून प्रवास करणे पसंत करतात.
चालक-वाहकांचे ऐकतो कोण ?एसटीत जागा नाही म्हणून चालक आणि वाहक प्रवाशांना बसमध्ये चढण्यास मनाई करतात. मात्र, लवकर आपल्या गावाकडे जायचे असल्याच्या मनःस्थितीत असलेेले प्रवासी एसटीच्या चालक, वाहकांना जुमानत नाहीत.
खासगी बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्यास कारवाईचे प्रावधान आहे. मात्र, राज्य शासनाच्या एसटी बसमध्ये मर्यादपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास कारवाई होत नाही का ?- श्रीधर राणे, प्रवासी
एसटीला नियम नाही का?कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. एसटी बसमध्ये रोजच्या रोज मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक करणाऱ्या वाहनावर, एसटी बसवरही कारवाई करण्यात येते. एसटी बसमध्ये काही प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची परवानगी आहे. असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई विभागातील पसंतीचे मार्गमुंबई ते पुणेमुंबई ते त्रंबकमुंबई ते सातारा मुंबई ते रत्नागिरीदररोज प्रवासी संख्या ५०,०००दररोजचे उत्पन्न ४५,००,०००