मालाड पूर्व येथिल दुर्घटनेत गंभीर जखमींना मिळणार पन्नास हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 10:20 PM2019-07-08T22:20:27+5:302019-07-08T22:20:40+5:30

- मनोहर कुंभेजकर मुंबई - दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील पिंपरीपाडा परिसरातील मुंबई महानगरपालिकेने उभारलेली भिंत  दि. २ जुलै रोजी झालेल्या ...

50 thousand people will be assisted by the grave injured in Malad East Corridor | मालाड पूर्व येथिल दुर्घटनेत गंभीर जखमींना मिळणार पन्नास हजारांची मदत

मालाड पूर्व येथिल दुर्घटनेत गंभीर जखमींना मिळणार पन्नास हजारांची मदत

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई - दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील पिंपरीपाडा परिसरातील मुंबई महानगरपालिकेने उभारलेली भिंत  दि. २ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने लगत असलेल्या झोपडयांवर कोसळून या दुर्घटनेत दि. ५ जुलै रोजी सायं. ५ वा. मिळालेल्या अधिकृत माहितीनूसार एकूण १२१ पैकी २७  रहिवाशी मृत पावले असून ७० जखमींवर अजून देखिल रुग्णालयात उपचार सुरु असून उर्वरित २४ जखमींना उपचार करुन महापालिका रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.  यामध्ये मृत पावलेल्या रहिवाश्यांना राज्य शासना तर्फे पाच लाख आणि महापालिकेतर्फे पाच लाख मदत जाहीर झाली असून जखमींना ५०००/-रु. (पाच हजार) मदत जाहीर झाली आहे, या जखमींमध्ये काही जखमींना अल्प दुखापत झाली असून काही नागरिक मात्र गंभीर जखमी झाले आहेत. ही बाब शिवसेना नेते, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर आणि शिवसेना विधींमंडळ मुख्य प्रतोद,स्थानिक आमदार,विभागप्रमुख, माजी महापौर सुनिल प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या निदर्शनास आणून दिली.यावेळी अशा गंभीर जखमींना जास्त मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर जखमींना पन्नास हजार मदत जाहीर केली. याबद्दल खासदार  गजानन कीर्तिकर आणि आमदार सुनिल प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. 

संरक्षक भिंत पडून झालेल्या आपदग्रस्त कुटूंबांचे आणि धोकादायक स्थितीत असलेल्या घरांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन विधानसभेच्या २०१९ च्या पावसाळी अधिवेशनामधील झालेल्या चर्चे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिल होतेे. सदर बाधित व धोकादायक स्थितीत घरे असलेल्या कुटूंबाचे व्यवसाय, नोकरी, उद्योग धंदे मुलांच्या शाळा,कॉलेज इत्यादी मालाड आणि लगतच्या परिसरात असल्याने सदर बाधीत कुटूंबाचे पुनर्वसन मालाड (पूर्व) येथे होणे आवश्यक आहे.या कुटूंबाचे पुनर्वसन करण्याकरिता झोपडपट्टी सुधार योजने मार्फत महापालिकेला,प्रकल्पग्रस्त बाधितांचे पुनर्वसन (पी.ए.पी.)अंतर्गत उपलब्ध होणा-या सदनिकांमध्ये विशेष बाब म्हणून सदर बाधितांचे पुनर्वसन तात्काळ करण्यात यावे अशी मागणी देखिल खासदार  कीर्तिकर आणि आमदार प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: 50 thousand people will be assisted by the grave injured in Malad East Corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.