Join us  

प्रतिष्ठित प्ले स्कूलसाठी मोजावे लागताहेत ५० हजार

By admin | Published: March 20, 2016 12:58 AM

स्मार्ट सिटीमध्ये मुलगा किंवा मुलगी जन्माला येताच आई-बाबा त्याला किंवा तिला कोणत्या शाळेत घालायचे हे ठरवून ठेवतात. मग त्यासाठी भली मोठी रक्कम भरायलाही

- प्राची सोनवणे,  नवी मुंबईस्मार्ट सिटीमध्ये मुलगा किंवा मुलगी जन्माला येताच आई-बाबा त्याला किंवा तिला कोणत्या शाळेत घालायचे हे ठरवून ठेवतात. मग त्यासाठी भली मोठी रक्कम भरायलाही मागेपुढे पाहिले जात नाही. शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत सर्वाधिक चालणारा व्यवसाय म्हणजे प्ले स्कूल. ठिकठिकाणी असलेल्या या प्ले स्कूलला गेल्या तीन वर्षांपासून वाढती मागणी असल्याने हा खासगी संस्थाचा हा धंदा फारच तेजीत सुरू असल्याचे पाहायला मिळते. नवी मुंबईतील या प्ले स्कूलमधील प्रवेश फी यंदा ५० हजारांच्या घरात गेली असून, पालकांना मात्र मुलाच्या शिक्षणासाठी खिसा खाली करावा लागत आहे.शहरातील प्रत्येक विभागातील प्ले स्कूलचा आढावा घेतला असता प्रत्येक संस्थेने मनाजोगी फी आकारल्याचे पाहायला मिळते. प्ले स्कूल ते पूर्व प्राथमिक वर्गापर्यंत चालविल्या जाणाऱ्या या खासगी संस्था शाळा प्रवेशाच्या नावाने पालकांची लुबाडणूक करीत असून, शिकवणी फीव्यतिरिक्त इतर अनेक उपक्रमांकरिता हजारो रुपयांची मागणी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. यामध्ये वर्षभर साजरे केले जाणारे सण-उत्सव, वार्षिक कार्यक्रम, सहल, पुस्तके, खेळणी, अभ्यासाचे साहित्य अशा विविध उपक्रमांकरिता हजारोंची लूट केली जात आहे. कायद्यानुसार या शाळांना फीवरील नियंत्रणामुळे या संस्थांनी आता शक्कल लढवून प्रत्येक विद्यार्थ्यामागे जास्तीत जास्त पैसे मिळावे, या उद्देशाने गणवेश, सहली, पार्टी, सेलीब्रेशन्स अशा उपक्रमांच्या नावाने भरमसाठ पैशांची मागणी केली जाते. मग यामध्ये डे केअर सेंटर सुरू करून नोकरी करणाऱ्या पालकांच्या मुलांकरिता अभ्यासाबरोबरच याच ठिकाणी संगोपनाचीही सोय करण्यात आल्याचे पाहायला मिळते. दीड वर्षापासून ते अडीच वर्षांपर्यंतची मुले प्ले स्कूलमध्ये तर दोन वर्षे सहा महिने ते साडेतीन वर्षांपर्यंतच्या मुलांना नर्सरीमध्ये प्रवेश दिला जात आहे. या शाळांकडून प्रवेश अर्जाच्या नावानेही साडेपाचशे ते पंधराशे रुपयांचा फटका पालकांना बसत आहे. प्रतिमहा शुल्क आकारण्याऐवजी वर्षभराचे पॅकेज देऊन एकाच वेळी ४० ते ५० हजार रुपयांची लूट केली जाते. ही शाळा केवळ दोन तासांसाठीच असते.बेलापूर येथील प्ले स्कूलमधील प्रवेश फी ३० हजार रुपये असून, याव्यतिरिक्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी इतर खर्च वेगळा असणार आहे.सीवुड्स येथील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या ठिकाणी प्ले स्कूलचे वर्षभराचे पॅकेज जवळापास ४५ ते ५० हजार रुपयांपर्यंत आहे. नेरूळमधील शाळांक डून ३५ हजार फी आकारली जात असून, यामध्ये सहल, वार्षिक क्रीडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी १० ते १५ हजार रुपये आकारले जात आहेत. वाशीतील प्ले ग्रुपमध्ये वार्षिक फी ४० ते ५० हजार रुपये इतकी असून, याव्यतिरिक्त गणवेश, शाळेच्या वेळेव्यतिरिक्त संगोपनासाठी दाखल केल्या जाणाऱ्या मुलांना आणखी फी भरावी लागणारशिशू वर्गासाठी आकारल्या जाणा-या फी वर निर्बंध घालण्याचे अधिकार महापालिकेकडे नाही. प्ले स्कुलच्या शहरातील संख्या वाढत असून या शाळांच्या फी वर चाप बसविलाच पाहिजे यामध्ये पालकांची होणारी फसवणूक नक्कीच थांबली पाहिजे.- बाळकृष्ण पाटील,शिक्षण अधिकारी, नवी मुंबई पालिका