मुंबईकरांच्या हक्काची जमीन बिल्डरच्या घशात? ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 10:43 AM2022-01-08T10:43:28+5:302022-01-08T11:57:43+5:30

Yogesh Sagar : ५०० कोटीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्वरीत स्थगितीचे आदेश निर्गमित करावे अन्यथा मला योग्य त्या कायदेशीर बाबीचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. 

500 crore corruption allegations in Mumbai ; Letter of BJP MLA Yogesh Sagar to Chief Minister Uddhav Thackeray | मुंबईकरांच्या हक्काची जमीन बिल्डरच्या घशात? ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबईकरांच्या हक्काची जमीन बिल्डरच्या घशात? ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

googlenewsNext

मुंबई  : मुंबईकरांची हक्काची जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट मुंबई पालिकेतील सत्ताधरी शिवसेना व राज्यातील महाविकास आघाडीच्या साथीदारांनी घातला आहे, असा आरोप करत ५०० कोटीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्वरीत स्थगितीचे आदेश निर्गमित करावे अन्यथा मला योग्य त्या कायदेशीर बाबीचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. 

यासंदर्भात भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मुंबईचा विकास आराखडा मंजूर करताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. पंरतु मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारमुळे आता उद्याने व खेळाचे उद्याने पुर्णपणे नामशेष झाले आहेत.  अशा परिस्थिति मनपाच्या ताब्यातील उद्यानाकरिता आरक्षित, कोणतेही अतिक्रमण नसलेला बांधकाम योग्य भूखंड अजमेरा बिल्डरला अदलाबदलती देण्यात आला आहे. बदल्यात अजमेरा बिल्डरकडे असणारा बांधकाम अयोग्य व पर्यावरणविषयक परवानग्याच्या कचाट्यात अडकणारा भूखंड मुंबई महापालिकेने माहुल पम्पिंग स्टेशनकरिता ताब्यात घेतला आहे. 

परंतु यातील खरा गैरव्यवहार स्पष्ट आहे, तो म्हणजे अजमेरा बिल्डरची पर्यावरणविषयक परवानग्या मिळवण्याच्या अनंत अडचणीतून सुटका करणे आणि या आदलाबदलीच्या व्यवहारात त्याचा सरळ सरळ ५०० कोटींचा फायदा करून देणे! त्यामुळे मुंबईकरांची हक्काची जमिन बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट सत्ताधरी सेना व महाविकास आघाडीच्या साथीदारांनी घातला आहे. गंभीर बाब म्हणजे  सुधार समितीच्या नोव्हेंबर २०२१च्या सभा विषय क्रमांक ६ मधील संदर्भीत भूखंडासाठी मुंबई मनपाने अधिग्रहणाकरित विकास अधिकार प्रमाणपत्र (DRC) श्री.ईश्वरलाल अजमेरा यांच्या नावाने ३९५५४.६० क्षेत्राकरीता दि. १२-०२ २००२ रोजी निर्गमित केले होते. आता परत तोच भूखंड आपण १९ वर्षाने त्याच अजमेरा व इतर सहा जणांच्या विकासकांच्या ताब्यात देत आहोत असे प्रस्तावावरून निर्देशित होते, असे योगेश सागर यांनी म्हटले आहे.


याचबरोबर, सर्वोच्च न्यालयाने निर्गमित केलेल्या कायद्या प्रमाणे एकदा कुठलाही भूखंड सार्वजनिक प्रयोजनाकरिता अधिगृहित केला असल्यास पुन्हा तो जमिन मालकाला किंवा खासगी व्यक्तीला देता येत नाही पण भ्रष्टाचारी सेना व अधिकारी एवढे मग्रूरीत आहेत की ते सर्वोच्च न्यायलयाने घातलेला पायंडा पायाखाली तुडवत आहे. विशेषत: या आदला बदलीच्या प्रस्तावावर सभागृहात कोणतही चर्चा न करता मंजूरी कशाप्रकारे देण्यात आली? याचा अर्थ ही आदला बदल फक्त भूखंडाचे श्रीखंड चाखण्यासाठीच केली गेली, हे स्पष्ट आहे. आपण या ५०० कोटीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्वरीत स्थगितीचे आदेश निर्गमित करावे अन्यथा  मला योग्य त्या कायदेशीर बाबीचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा योगेश सागर यांनी दिला आहे. 

 

Web Title: 500 crore corruption allegations in Mumbai ; Letter of BJP MLA Yogesh Sagar to Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.