अतिवृष्टीने मुंबईत ५०० कोटींची हानी; कोकणसह मुंबईसाठी निधीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 07:55 AM2020-08-11T07:55:34+5:302020-08-11T07:56:30+5:30

पंतप्रधानांनी महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि आसाम या सहा राज्यांत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

500 crore loss due to heavy rains in Mumbai | अतिवृष्टीने मुंबईत ५०० कोटींची हानी; कोकणसह मुंबईसाठी निधीची गरज

अतिवृष्टीने मुंबईत ५०० कोटींची हानी; कोकणसह मुंबईसाठी निधीची गरज

Next

मुंबई : मुंबईत ५ आॅगस्ट रोजी झालेल्या वादळी पावसाने ५०० कोटी रुपयांची हानी झाली असून त्यापूर्वी कोकणात निसर्ग चक्रीवादळाने राज्यात १ हजार ६५ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने या संदर्भात तत्काळ आर्थिक मदत राज्याला द्यावी, अशी मागणी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

पंतप्रधानांनी महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि आसाम या सहा राज्यांत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आदी उपस्थित होते. आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करताना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच आजच्या बैठकीतील सूचनांवर लवकरच निर्णय घेण्यात येतील, असे ते म्हणाले.

काही तासांत स्थिती पूर्वपदावर
मुंबईतील ५ आॅगस्टच्या २४ तासांत ३३३ मिमी. पाऊस झाला. याही परिस्थितीत राज्य शासनाने आणि महापालिकेने सज्जता दाखवत पुढील काही तासांमध्ये स्थिती पूर्वपदावर आणली, असे ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले. नदी जोड प्रकल्प, रिअर टाइम डाटासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर, नदीकिनारी होणारी अतिक्रमणे, फ्लड डॅम्स उभारणे, पूरग्रस्त भागातील पाणी अन्य खोऱ्यात नेणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केलेल्या मागण्या
नैसर्गिक आपत्ती निवारण व समन्वयासाठी राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करावी.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची जागा मुंबई महापालिकेस हस्तांतरित केल्यास माहुल पंपिंग स्टेशनच्या उभारणीच्या कामाला गती येईल. हे स्टेशन उभे राहिल्यास हिंदमाता, दादर, वडाळा या भागातील पावसाचे साचणारे पाणी बाहेर काढणे शक्य होईल.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा मीटरगेज मार्ग ब्रॉडगेज करताना तो व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्गातून नेल्यास जंगलाचे रक्षण तर होईलच, परंतु मानवी वस्तीलाही रेल्वेसेवेचा अधिक लाभ घेता येईल.
मराठवाड्याच्या हवामान अंदाजासाठी औरंगाबाद येथे स्वतंत्र डॉप्लर रडार उभारावे.

Web Title: 500 crore loss due to heavy rains in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.