मुंबई- रिक्षा चालक आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन उत्तर मुंबईतील ५०० रिक्षा चालकांसाठी ‘मुंबई यूथ असोसिएशन’च्या वतीने कोरोना सुरक्षा कवचाची योजना राबवली. रिक्षाचालक आणि प्रवासी यामध्ये जाड प्लास्टिकची शिल्ड असलेले हे कोरोना सुरक्षा कवच आहे, अशी माहिती मुंबई यूथ असोसिएशनचे अध्यक्ष व
आयोजक वैभव दामोदर म्हात्रे यांनी दिली.
वैभव म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली बोरिवली पश्चिम येथील साईबाबानगर येयील साईकृपा हॉलमध्ये झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात उत्तर मुंबईतील सुमारे ५०० रिक्षा चालकांसाठी कोरोना सुरक्षा शिल्डचे वाटप करण्यात आले.
सध्याच्या कोविड परिस्थितीत धंदा नसल्याने कोरोना सुरक्षा कवच विकत घेणे रिक्षा चालकांना कठीण आहे. त्यामुळे रिक्षा चालकांची आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन उत्तर मुंबईतील सुमारे ५०० रिक्षा चालकांसाठी कोरोना सुरक्षा कवच योजना राबविल्याबद्धल विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांनी वैभव म्हात्रे यांचे कौतुक केले.