वरळीतील ५०० शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश; दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेनेला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 06:24 AM2022-10-03T06:24:29+5:302022-10-03T06:25:06+5:30
दसरा मेळावा तोंडावर असताना युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदारसंघातून आमदार आहेत तिथल्या अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: दसरा मेळावा तोंडावर असताना युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदारसंघातून आमदार आहेत तिथल्या अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्यात ५०० शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. हे सर्व शिवसैनिक वरळी कोळीवाड्यातील आहेत.
मात्र या शिवसैनिकांना दिशाभूल करून वर्षावर नेण्यात आल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. सागरी मार्गासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचे आहे सांगून शिवसैनिकांना वर्षावर नेल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
स्थानिक आमदारांनी अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वरळीतील शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. स्थानिक आमदार वेळही देत नव्हते, त्यामुळे लोकांमध्ये मोठा असंतोष होता. - सदा सरवणकर, शिंदे गटातील आमदार
सागरी किनारा मार्गाबाबत काही लोकांना निवेदन घेऊन या असे सांगितले होते. याचाच फायदा उठवून वरळीतील शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला असे सांगितले जात आहे. - सुनील शिंदे, शिवसेना आमदार
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"