Vidhan Sabha 2019: निवडणुकीसाठी ६० हजार कर्मचारी तैनात; ७ हजार ३९७ मतदार केंद्रांवर प्रत्येकी ४ जणांची टीम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 04:59 AM2019-10-06T04:59:13+5:302019-10-06T04:59:33+5:30
केंद्र सरकार, राज्य सरकार व निम सरकारी सेवेत असलेल्या कर्मचा-यांना व अधिका-यांना या सेवेत सामावून घेण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा हा राज्यातील तब्बल २६ विधानसभा मतदारसंघ असलेला सर्वांत मोठा जिल्हा आहे. यामध्ये तब्बल ७२ लाख २६ हजार ८२६ मतदार, ७ हजार ३९७ मतदान केंद्रे व सुमारे ६० हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांचा ताफा निवडणूक प्रक्रियेत गुंतलेला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र बोरकर हे या प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम करीत आहेत.
केंद्र सरकार, राज्य सरकार व निम सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाºयांना व अधिका-यांना या सेवेत सामावून घेण्यात आले आहे. या जिल्ह्यात ६० हजार कर्मचारी कामासाठी घेण्यात आले असून, त्यापैकी १० हजार शिपाई आहेत, तर उर्वरित ५० हजार कर्मचाºयांपैकी १० हजार कर्मचारी विविध पथकांमध्ये कार्यरत राहतील. ७ हजार ३९७ केंद्रावर प्रत्येकी ४ जणांची टीम बनविण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे ३३ हजार कर्मचारी, अधिकाºयांचा समावेश असेल. एका मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष म्हणून एक अधिकारी, त्या खाली दोन सहायक अधिकारी व एक शिपाई अशा चार जणांची चमू तयार करण्यात येत आहे. मतदानाला २ दिवस बाकी असताना त्यामधील कर्मचाºयांना कोणत्या बुथवर काम करायचे आहे, हे निश्चित केले जाईल. पहिल्या टप्प्यात एकूण गरजेच्या १२५ टक्के कर्मचाºयांची निवड केली जाते. त्यानंतर, दुसºया टप्प्यात ११० टक्के कर्मचारी निवडले जातात, असे सांगण्यात आले. ईव्हीएम मशिनबाबत कोणतीही तक्रार येऊ नये, यासाठी पुरेशा प्रमाणात अतिरिक्त ईव्हीएमसोबत ठेवण्यात येतात. एखाद्या ईव्हीएममध्ये दोन तासांपेक्षा जास्त बिघाड झाल्यास ते मशिन बदलण्यात येते.