ढाब्यावर दारू प्यायल्यास ५० हजारांचा दंड; सरकारचा कडक शब्दात इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 11:54 AM2023-09-10T11:54:40+5:302023-09-10T11:55:42+5:30

कोर्टाच्या कारवाईला जावे लागेल सामोरे

50,000 fine for drinking liquor at a dhaba; A stern warning from the government | ढाब्यावर दारू प्यायल्यास ५० हजारांचा दंड; सरकारचा कडक शब्दात इशारा

ढाब्यावर दारू प्यायल्यास ५० हजारांचा दंड; सरकारचा कडक शब्दात इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेकायदा आणि बनावट मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, ढाबा आणि चायनीज सेंटर चालकांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता तेथे बेकायदा बसणाऱ्या मद्यपींवरही कायद्याचा बडगा उगारला आहे. मद्यविक्रीस आणि मद्यप्राशनास परवानगी नसलेले हॉटेल, ढाबे आणि चायनीज सेंटरमध्ये दारू प्याल तर; कोर्टाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळीरामांनासह ढाबे चालक-मालक यांना दिला आहे.

ढाबा चालकांना दंड 
ढाब्यावर केवळ जेवण करता येते. त्यामुळे ढाब्यावर मद्यपान करणे गुन्हा ठरतो. यात गुन्हा दाखल करून ढाबाचालकांना लाखोंचा दंड आकारण्यात येतो. गुन्हा दाखल केल्यावर कोर्टात जावे लागते.

परवानगी नसतानाही बिनदास्तपणे दारू विक्री
ढाबाचालकांना दारू विक्री करण्याची परवानगी नसते. ढाब्यावर दारू पिणाऱ्यांवरही कारवाई होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई केली जाते. दारू विक्री करणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करणे यासाठी स्वतंत्र परवाने असतात. त्या परवान्याच्या आधीन राहूनच दारूची विक्री करता येते. मात्र बाहेरून दारू आणून ढाब्यांवर पिण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ढाबाचालकही ग्राहकांना दारू उपलब्ध करून देतात.

  ढाब्यांची नियमित तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून होते. दारू विक्री होत असलेल्या ढाबाचालकांवर गुन्हे दाखल केले जातात. ढाब्यांवर दारू पिणाऱ्यांवरही कारवाई होते असे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे म्हणणे आहे.

दीडशे जणांवर कारवाई 
पुणे-नाशिक, पुणे-मुंबई, मुंबई -बंगळुरू महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग या मुख्य मार्गांवर अवजड वाहनचालक ढाब्यांवर मद्यपान करतात. या ठिकाणी आतापर्यंत दीडशे जणांवर कारवाई झाली आहे.

 

Web Title: 50,000 fine for drinking liquor at a dhaba; A stern warning from the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.