पुराचा फटका बसलेल्या दुकानदारांना ५० हजार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 08:17 AM2023-07-29T08:17:51+5:302023-07-29T08:18:08+5:30
सर्व प्रकारची वाढीव मदत जून ते ऑक्टोबर, २०२३ या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
मुंबई : नैसर्गिक आपत्तीमध्ये (महापूर आदी) नुकसान झालेल्यांना पाच हजार रुपयांऐवजी दहा हजार रुपयांची तत्काळ मदत करण्याबरोबरच नुकसान झालेल्या दुकानदारांना ५० हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. सर्व प्रकारची वाढीव मदत जून ते ऑक्टोबर, २०२३ या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
कुणाला किती मिळेल मदत?
१०,००० नैसर्गिक आपत्तीत घरातील कपड्यांचे नुकसान आणि घरगुती भांडीकुंडी यांच्या नुकसानीसाठी आता १० हजार रुपये..
५०,००० दुकान पाण्यात बुडालेले असल्यास, दुकान पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा दुकानांचे संपूर्ण नुकसान झाले असल्यास पंचनाम्याच्या आधारे नुकसानाच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत मदत.
७५% टपरीधारकांनासुद्धा पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत मदत
यांना मदत...जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांना ही मदत मिळेल.