मुंबईत ५०४ कोरोनाबाधित; १३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:19+5:302021-07-11T04:06:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शनिवारी मुंबईत दिवसभरात ५०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शनिवारी मुंबईत दिवसभरात ५०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०७ टक्के एवढा आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ९०९ दिवसांवर पोहोचला आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख २७ हजार १४१ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख एक हजार ७१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ६१२ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सात हजार ४८४ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी मृत्युमुखी पडलेल्या १३ रुग्णांपैकी नऊ रुग्णांना सहव्याधी होत्या.
मृतांमध्ये पाच पुरुष, तर आठ महिला रुग्णांचा समावेश होता. आठ मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर पाच रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दिवसभरात ३७ हजार ३६ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ७४ लाख ९९ हजार ५९४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.