Join us  

शिवडीत साकारली ५१ फूट उंच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती

By मनोहर कुंभेजकर | Published: November 10, 2023 4:09 PM

मुंबईच्या शिवडीमध्ये चक्क ५१ फूट उंच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

मुंबईदिवाळीत  साजरा होणाऱ्या दीपोत्सवा मध्ये आकर्षित, मनमोहक अशी ५१ फूट उंच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.शिवडीची श्री महालक्ष्मी मूर्ती, नेत्रदीपक सजावट व आयोजनासाठी सुप्रसिध्द असलेले शिवडीतील शिवडीची श्री महालक्ष्मी  सार्वजनिक दीपोत्सव मंडळ  यंदा हिरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. 

गतवर्षी साकारलेल्या तिरूपती बालाजीच्या देखाव्यास अनुसरून यंदा श्री महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती तसेच महालक्ष्मी मातेची  आकर्षित, मनमोहक मूर्ती हे यंदाचे प्रमुख आकर्षण आहे. या सजावटीच्या मागेही एक संकल्पना आहे ती म्हणजे तिरूपती बालाजीचे दर्शन हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाशिवाय अपूर्ण आहे अशी आख्यायिका आहे. यालाच अनुसरून यंदा ५१ फूट उंच असे महालक्ष्मी मंदिर या मंडळाने साकारली आहे अशी माहिती उबाठाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी लोकमतला दिली.

उत्सवाचा कालावधी आज शुक्रवार दि, १० नोव्हेंबर  ते शनिवार १८ नोव्हेंबर  असा असून अभ्युदय बँक समोर,आशीर्वाद सोसायटी जवळ,शिवडी नाका  (पश्चिम) येथे हे भव्यदिव्य आयोजन, सकारात्मक ऊर्जा व प्रसन्न चैतन्यमय वातावरण आपल्यास अनुभवायला मिळेल अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :मुंबई