Join us

भविष्य निर्वाह निधीला ओहोटी, दररोज ५१ हजार कर्मचारी काढतात पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 6:40 AM

कोरोनाचा फटका : दररोज ५१ हजार कर्मचारी काढतात पीएफ निधीतील पैसे

संदीप शिंदे 

मुंबई : कोरोना संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेली आर्थिक चणचण कमी करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीतली रक्कम काढण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. दररोज सरासरी ५१ हजार याप्रमाणे गेल्या ७२ दिवसांत तब्बल ३७ लाख कर्मचाऱ्यांना हे कोविड आणि नॉन कोविडचे क्लेम देण्यात आले आहेत. ती रक्कम सुमारे २५ हजार कोटी रुपयांपर्यंत झेपावल्याची माहिती हाती आली आहे.

कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीतील काही रक्कम काढण्याची मुभा केंद्र सरकारने नोंदणीकृत कर्मचाºयांना दिली आहे. भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या कर्मचाºयांना आपले तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या एकत्रित रकमेच्या ७५ टक्के रक्कम म्हणजे जवळपास दीड महिन्याच्या वेतनाएवढी रक्कम खात्यातून काढता येते.ही रक्कम मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे प्रमाण सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात दिवसागणिक वाढू लागल्याच चित्र पाहायला मिळत आहे. १ एप्रिलपासून तब्बल १९ लाख ३ हजार ९६१ कामगारांचे अर्ज मंजूर करून त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच, घरबांधणी, घर दुरुस्ती, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आदी सहा ते सात कारणांसाठी नोकरदारांना पीएफमधील पैसे काढण्याची मुभा पूर्वीपासूनच आहे. या कारणांसाठी पैसे काढण्याच्या अटी दोन वर्षांपूर्वी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्या पर्यायाचा वापर करून भविष्य निर्वाह निधीतले पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. १ एप्रिलपासून या मार्गाने तब्बल १७ लाख ९२ हजार ६२९ नोकरदारांनी पैसे काढल्याची माहिती हाती आली आहे.देशभरात साधारणत: ४ कोटी नोंदणीकृत नोकरदार आहेत. कोविड आणि नॉन कोविड क्लेमची संख्या एकत्र केल्यास तब्बल ३७ लाखांपेक्षा जास्त कर्मचाºयांनी या खात्यातून पैसे काढले आहेत.दोन्ही पर्यायांचा वापरच्अनेक जण कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही पर्यायांचा वापर करून पैसे काढत असल्याचे निरीक्षण अधिकाºयांनी नोंदविले आहे. निवृत्तीनंतरची तरतूद म्हणून या खात्यांमध्ये नोकरदारांचे पैसे जमा केले जातात. त्यावर बँका किंवा अन्य वित्तीय संस्थांपेक्षा जास्त दराने व्याज मिळते.च्मात्र, सध्या अनेकांच्या नोकºया गेल्या आहेत. काहींच्या वेतनात कपात झाली आहे, तर काही जणांना वेतनच मिळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही रक्कम काढली जात आहे. नोकरदारांसाठी तो मोठा आधार ठरत असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.महिना कोविड क्लेम नॉन कोविड(रुपये) क्लेम (रुपये)१ ते ३१ एप्रिल ८,४४,९४७ ६,९९,०४६१ ते ३१ मे ७,२६,३५१ ८,९४,६१७१ ते १० जून २,२१,३३१ ३,६०,२९८

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापैसा