श्रीकांत जाधव - मुंबई : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी होत आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात - ३० उमेदवारांचे ४२ अर्ज, दिंडोरी - २० उमेदवारांचे २९ अर्ज, नाशिक - ३९ उमेदवारांचे ५६ अर्ज, पालघर - १७ उमेदवारांचे २६ अर्ज, भिवंडी - ४१ उमेदवारांचे ४८ अर्ज, कल्याण - ३४ उमेदवारांचे ४५ अर्ज, ठाणे - ३६ उमेदवारांचे ४३ अर्ज.
- मुंबईत २२३ अर्ज ( बॉक्स ) मुंबई उत्तर - २५ उमेदवारांचे ३२ अर्ज, मुंबई उत्तर पश्चिम - २९ उमेदवारांचे ३३ अर्ज, मुंबई उत्तर - पूर्व - ३४ उमेदवारांचे ४२ अर्ज, मुंबई उत्तर – मध्य - ३९ उमेदवारांचे ४५ अर्ज, मुंबई दक्षिण – मध्य - ३२ उमेदवारांचे ४१ अर्ज, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात २१ उमेदवारांचे ३० अर्ज दाखल झाले आहेत.