मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि मुंबई अल्ट्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यदिनी दादर शिवाजी उद्यान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्माराकामध्ये आयोजिलेल्या रक्तदान शिबिरासाठी ९८० लोकांनी नोंदणी केली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या शिबिरामध्ये ६६२ जण आले. त्यामधील १५० व्यक्ती रक्तदान करण्यासाठी अपात्र ठरल्या आणि ५१२ लोकांचे रक्तदान यशस्वी झाले.
--------------
आरोग्य शिबिर
मुंबई : इन्सानियत फर्स्ट फाऊंडेशनतर्फे पवईच्या तुंगा गावातील सुन्नी रहमानिया जामा मशीदच्या सभागृहात आयोजित मोफत मेडिकल कॅम्पचे उदघाटन माहिती कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले. यावेळी नगरसेविका अश्विनी माटेकर, संस्थेचे अध्यक्ष अशरफ शेख उपस्थित होते.
--------------
नागरी कामाचा शुभारंभ
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्याने नागरी कामाच्या शुभारंभांना वेग येत असून, कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार येथील अनेक नागरी कामे हाती घेण्यात आली आहेत. यात गटारी, शौचालय, सभा मंडप, लादीकरण अशा कामांचा समावेश आहे.