मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यभरात आज नव्या 5134 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,17,121 वर पोहचली आहे. राज्यात आज 224 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
राज्यात आत्तापर्यंत 9250 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज राज्यभरातून 3296 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच आतापर्यंत एकूण 1 लाख 18 हजार 558 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण 89 हजार 294 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 61 हजार 311 नमुन्यांपैकी 2 लाख 17 हजार 121 (18.69 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 31 हजार 985 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 45 हजार 463 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 7 लाखांच्या घरात गेला आहे. सध्या देशात 6 लाख 97 हजार 413 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 2 लाख 53 हजार 287 सक्रीय रुग्ण आहेत. तर 4 लाख 24 हजार 433 रुग्म निरोगी झाले आहेत. तर, एकूण मृतांची संख्या 19 हजार 693 झाली आहे.