मुंबईत ४,७५४ कोटींच्या ५२ आलिशान घरांची विक्री; उलाढालीत देशात शहराचा सर्वाधिक वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:46 IST2025-01-10T14:46:21+5:302025-01-10T14:46:49+5:30

मुंबईतील १६ घरे १०० कोटींच्यापुढे! वरळी, मलबार हिला, जुहू-पार्ल्याला पसंती

52 luxury houses worth Rs 4,754 crore sold in Mumbai; City has highest share in turnover in the country | मुंबईत ४,७५४ कोटींच्या ५२ आलिशान घरांची विक्री; उलाढालीत देशात शहराचा सर्वाधिक वाटा

मुंबईत ४,७५४ कोटींच्या ५२ आलिशान घरांची विक्री; उलाढालीत देशात शहराचा सर्वाधिक वाटा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नुकत्याच सरलेल्या २०२४ या वर्षात देशात गृहविक्रीमध्ये मुंबईने अग्रगण्य स्थान गाठल्यानंतर आता मुंबईत एकूण ५२ आलिशान घरांची विक्री झाल्याची माहिती पुढे आली आहे. या ५२ घरांच्या विक्रीतून तब्बल ४,७५४ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या कंपनीचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

त्यातही देशातील अन्य शहरांत झालेल्या आलिशान घरांच्या विक्रीत मुंबईचा वाटा ८८ टक्के इतका असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुंबईनंतर दिल्ली-एनसीआरचा क्रमांक असून तेथे एकूण ३ आलिशान घरांची विक्री झाली आहे, तर हैदराबाद आणि बंगळुरू येथे प्रत्येकी दोन आलिशान घरांची विक्री झाली आहे.

मुंबईतील १६ घरे १०० कोटींच्यापुढे!

या सर्वेक्षणानुसार, २०२४ या वर्षी मुंबईसह दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, बंगळुरू, पुणे या आणि अशा सात प्रमुख शहरांत एकूण ५९ आलिशान घरांची विक्री झाली. यापैकी एकट्या मुंबईत ५२ घरांची विक्री झाली आहे. यातील एका आलिशान घराची किंमत किमान ४० कोटी रुपयांपासून २०० कोटी रुपयांपर्यंत आहे. १७ घरांची किंमत ही १०० कोटी रुपयांच्या पुढे आहे. या १७ घरांच्या विक्रीद्वारे २३४४ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मुंबईत विक्री झालेल्या ५२ घरांपैकी १६ घरांच्या किमती या १०० कोटी रुपयांच्या पुढे आहेत.

वरळी, मलबार हिला, जुहू-पार्ल्याला पसंती

आलिशान घरांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मुंबईत वरळी, मलबार हिल, पाली हिल, जुहू-पार्ले या ठिकाणांना पसंती दिली आहे. तर, कफ परेड येथे देखील एका बंगल्याची विक्री झाली आहे. एकूण ५९ घर विक्रीमध्ये ५३ घरे ही आलिशान इमारतीमध्ये आहेत, तर उर्वरित सहा मालमत्ता या बंगल्याच्या स्वरूपातील आहेत. दरम्यान, २०२३ या वर्षाच्या तुलनेत २०२४ या वर्षी आलिशान मालमत्तांच्या विक्रीमध्ये १७ टक्के इतकी वाढ नोंदली गेली आहे.

जाब विचारल्याने हाणामारी

छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शेजारील पाड्यांमध्ये राहणाऱ्या दोन गटांतील कुटुंबीयांमध्ये लहान मुलाला मारल्याच्या वादातून हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अजित हॉस्पिटलसमोर घडली. ज्ञानेश्वर वारूळे व शोभा आहिरे अशी जखमींची नावे आहेत. निजामपुरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन गटातील सहा जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 52 luxury houses worth Rs 4,754 crore sold in Mumbai; City has highest share in turnover in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई