राज्यात ५२ हजार ९६० रुग्ण उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:13 AM2021-01-13T04:13:15+5:302021-01-13T04:13:15+5:30
मुंबई : राज्यात दिवसभरात २,४०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १८,६१,४०० रुग्ण कोरोनामुक्त ...
मुंबई : राज्यात दिवसभरात २,४०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १८,६१,४०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात ५२ हजार ९६० रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यात शनिवारी ३,५८१ रुग्ण आणि ५७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९,६५,५५६ झाली आहे, तर मृतांची संख्या ५० हजार २७ झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.५५ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३३,३८,४८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,६५,५५६ (१४.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३४,५४५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २,४७४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ५७ मृत्युंपैकी ४० मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ११ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ५७ मृत्युंमध्ये मुंबई ८, ठाणे २, ठाणे मनपा ५, नवी मुंबई मनपा २, उल्हासनगर मनपा १, नाशिक २, नाशिक मनपा २, अहमदनगर मनपा १, जळगाव १, नंदुरबार ५, पुणे १, पुणे मनपा १, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर १, सोलापूर मनपा ३, सातारा ५, कोल्हापूर मनपा ३, परभणी १, लातूर १, लातूर मनपा १, उस्मानाबाद १, बीड १, नागपूर १, नागपूर मनपा २, भंडारा २, गोंदिया १, चंद्रपूर मनपा १ आणि अन्य राज्य-देशातील १ इ. रुग्णांचा समावेश आहे.