मुंबईतून ५२ वाँटेड आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:36 AM2021-02-05T04:36:15+5:302021-02-05T04:36:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत ऑल आउट ऑपरेशन अंतर्गत वाँटेड आरोपींची धरपकड सुरू आहे. यात अवघ्या तीन तासांत ...

52 wanted accused arrested from Mumbai | मुंबईतून ५२ वाँटेड आरोपींना अटक

मुंबईतून ५२ वाँटेड आरोपींना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत ऑल आउट ऑपरेशन अंतर्गत वाँटेड आरोपींची धरपकड सुरू आहे. यात अवघ्या तीन तासांत ५२ वाँटेड आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात येत आहे. यात पाचही प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, १२ परिमंडळाचे पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत एकाच वेळी मुंबईत आरोपीची धरपकड करण्यात येत आहे.

शनिवारी रात्री ११ ते मध्यरात्री २ पर्यंत हे ऑपरेशन सुरू होते. २२३ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील एक हजार ३६९ आरोपींची झाडाझडती घेण्यात आली. त्यापैकी ३४९ आरोपी पोलिसांच्या हाती लागले. अशात ५२ पाहिजे व फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या अटक सत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.

.....

आरोपीसाठी २५/५० चा फॉर्म्यूला

मुंबईत गुन्हेगारी वृत्तीला आवर घालण्यासाठी मुंबई पोलिसांकडून अनोखी शक्कल लढविण्यात येत आहे. यात प्रत्येक पोलीस ठाण्यातील टॉप २५ सराईत गुन्हेगारांची यादी काढण्यात येत आहे. या गुन्हेगाराकडून पुन्हा गुन्हा करणार नाही यासाठी बाँड लिहून घेण्यात येत आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यास दंडाची रक्कम ५० लाखांपर्यंत आहे. यापूर्वी पाच हजार रुपये दंड होता. मात्र, ही रक्कम कमी असल्याने याकडे दुर्लक्ष होत होते.

.....

३०४३ गुन्हेगारांची यादी...

मुंबईतल्या सर्व पोलीस ठाण्यांमधील ३०४३ गुन्हेगारांची यादी बनविण्यात आली आहे. करारामधील रकमेची तरतूद बॉण्ड भरणाऱ्याच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असणार आहे, असे कायदा व सुव्यवस्थेचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले आहे. यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला रोख आणण्यास मदत होईल, असा विश्वासही पोलिसांनी वर्तविला आहे.

Web Title: 52 wanted accused arrested from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.