अजित मांडके ल्ल ठाणेठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हिमोफिलीया या आजाराचे आजच्या घडीला ५२० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जागतिक हिमोफिलीया दिनी उघड झाली आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण हे १ ते २ टक्के एवढे आहे, तर मुलांचे प्रमाण जवळ - जवळ ९८ टक्के असून लहान मुलांचे प्रमाण हे ४० टक्यांच्यावर माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. हा आजार अनुवंशिक असला तरी यावर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासन सज्ज आहे. विशेष म्हणजे या आजाराविषयी जनजागृती आणि उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात केवळ तीनच केंद्र आहेत.१७ एप्रिल हा जागतिक हिमोफिलीया दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु या आजाराविषयी आजही हवी तेवढी जनजागृती झालेली नाही. हा आजार अनुवंशिक असून आई पासून मुलांना हा आजार अधिक प्रमाणात जडत असल्याची माहिती या आजारावर काम करणाऱ्या सिव्हील रुग्णालयातील हिमॅटोलॉजी विभागाने दिली. या रुग्णालयात मार्च २०१३ मध्ये हा विभाग सुरु करण्यात आला आहे. आता पर्यंत या आजाराचे ५२० रुग्ण आढळले असून त्यांच्यावर वेळोवेळी उपचार सुरु आहेत. या आजारावर प्रामुख्याने जनजागृती हाच उपाय असू शकतो. जखम होऊन रक्तस्राव थांबत नसल्यास डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेणे अत्यंत महत्वाचे आहे, असे रुग्णालयाने या निमित्ताने स्पष्ट केले आहे. ४हिमोफिलीया हा अनुवंशिक आजार असून पालकांच्या जनुकांद्वारे ही विकृती मुलांमध्ये येते. पुरुषांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात व स्त्रीया या आजाराच्या वाहक असतात. ४मानवी शरीरात १३ प्रकारचे फॅक्टर (रक्त घटक) असतात. परंतु काहींच्या शरीरामध्ये यातील ८ ते ९ फॅक्टर्सची उणीव असते. काहींच्या शरीरात ७, ८, ९, ११ हे फॅक्टर नसतात. त्यांना या आजाराची लागण होते. ४विशेष म्हणजे ज्यांच्या शरीरात ८ वा फॅक्टर नसतो. त्यांच्यावर उपचारासाठीचे २५० एमएल चे इंजेक्शन हे पाच ते सहा हजार, ८ व ९ रक्त घटक नसल्यांसाठीचे इंजेक्शन हे २५ ते ३० हजार आणि ७ रक्त घटक नसल्यास १ एमजी साठी ४३ हजार रुपये मोजावे लागतात. हिमोफिलीयाची लक्षणेया आजाराचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे रक्तस्त्राव. ते अंतर्गत (डोळ्यांना न दिसणारे) किंवा बाह्य असू शकते जे डोळ्यांना दिसून येते. काहीवेळेला कोणत्याही स्पष्ट कारणाविना रक्तस्त्राव होऊ शकतो. हा आजार असलेल्या लोकांना इतरांच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणात किंवा वेगाने रक्तस्त्राव होत नाही. उलट, त्यांचा रक्तस्त्राव दिर्घकाळपर्यंत चालू राहतो.हिमोफिलीयाची गुंतागुंत... : खोल अंतर्गत रक्तस्त्राव, हिमॅथ्रोसिसमुळे सांध्यांचे नुकसान, तीव्र वेदना, आकार वेडावाकडा होणे, आणि सांधा पूर्णपणे निकामी होणे, अपंगत्व येणे, मेंदूच्या कवटीतून होणारा रक्तस्त्राव ही गंभीर स्वरुपाची वैद्यकीय आपात्कालीन स्थिती आहे.४ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात या आजारावरील औषधोपोचार मोफत उपलब्ध करुन देण्यात आले असून, ती पुरेशा प्रमाणात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या आजारामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया सदोष असल्याने या आजारात जखम झाल्यावर अथवा दात काढल्यावर रक्त वाहणे बंद होत नाही. ४या आजारात रक्त गोठण्यासाठी शरीरातील उपयुक्त फॅक्टर ८ व ९ चा संपूर्ण अभाव अथवा कमतरता असते. या अजाराच्या रुग्णांना इंजेक्शनद्वारे फॅक्टर आठ अथवा नऊ देण्यात येते. विशेष म्हणजे जर पुरुष आणि महिला या दोघांना हा आजार असेल आणि त्यांनी एकमेकांशी विवाह केल्यास त्यांच्यापासून होणाऱ्या बाळाला याची लागण हमखास होते.रक्तस्त्रावासाठी प्रथमोपचार...रक्तस्त्राव होणारा सांधा किंवा स्नायू हलवू नये, दंड अथवा पाय उशीवर किंवा एखाद्या लोळीमध्ये आरामाच्या स्थितीत ठेवावेत. बर्फाचा पॅक एखाद्या ओल्या किंवा ओलसर कापडात गुंडाळावा आणि रक्तस्त्राव होणाऱ्या भागावर (सांधा किंवा स्नायु) ५ मिनिटे ठेवावा. यानंतर १० मिनिटे काढून ठेवावे. सांध्यावर कापड किंवा इलेस्टीक स्टॉकींगच्या मदतीने हलकेच दबाव द्या, रक्तस्त्राव होणारा सांधा किंवा स्नायू हृदयाच्या पातळीवर उंचवावा.
हिमोफिलीयाचे ५२० रुग्ण
By admin | Published: April 16, 2015 10:48 PM