राज्यात ५२.६८ टक्के लसीकरण; सुमारे १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना लसीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:08 AM2021-01-20T04:08:27+5:302021-01-20T04:08:27+5:30

मुंबई : राज्यात मंगळवारी विविध केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. दिवसभरात उशिरापर्यंत १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना लस ...

52.68 per cent vaccination in the state; About 14 thousand 883 employees benefited from the vaccine | राज्यात ५२.६८ टक्के लसीकरण; सुमारे १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना लसीचा लाभ

राज्यात ५२.६८ टक्के लसीकरण; सुमारे १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना लसीचा लाभ

Next

मुंबई : राज्यात मंगळवारी विविध केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. दिवसभरात उशिरापर्यंत १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. या टप्प्यात लसीकरणाचे प्रमाण ५२.६८ टक्के इतके आहे.

राज्यात सर्वाधिक लसीकरण पुन्हा मुंबईत झाले असून १ हजार ५९७ लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्याखालोखाल ठाण्यात १ हजार ४३४ तर पुण्यात १ हजार ४०३ लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे. दिवसभरात हिंगोलीत सर्वांत कमी १२० लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे. राज्यात शनिवारी ३४ जिल्हे आणि २७ महापालिका क्षेत्रांमध्ये लसीकरणाचे सत्र सुरू झाले असून कोविन पोर्टलवर १७ हजार ७६२ व्हॅक्सिनेटर्स आणि ७ लाख ८५ हजार ९२७ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. लस घेतल्यानंतर गंभीर प्रतिकूल परिणाम झाल्याची घटना झाली नसून उद्यादेखील लसीकरण सत्र आयोजित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

राज्यात १६ जानेवारीला झालेल्या लसीकरणात पहिल्या दिवशी १८ हजार ३३८ हून अधिक कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, हे प्रमाण ६४ टक्के इतके होते. या वेळी मुंबईत सर्वाधिक लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला होता, ही संख्या १ हजार ९२६ इतकी होती.

चौकट

(कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) :

अकोला (१८१), अमरावती (२३९), बुलडाणा (३५९), वाशिम (२१२), यवतमाळ (२८९), औरंगाबाद (३३५), हिंगोली (१२०), जालना (२३१), परभणी (२२९), कोल्हापूर (५४५), रत्नागिरी (२४५), सांगली (४३२), सिंधुदुर्ग (१६१), बीड (१४२), लातूर (२२१), नांदेड (२७६), उस्मानाबाद (२३८), मुंबई (५९५), मुंबई उपनगर (१००२), भंडारा (२०६), चंद्रपूर (३९९), गडचिरोली (१८७), गोंदिया (१४४), नागपूर (६५६), वर्धा (३८६), अहमदनगर (६५०), धुळे (३१३), जळगाव (३९७), नंदुरबार (२८५), नाशिक (७१०), पुणे (१,४०३), सातारा (५११), सोलापूर (६८१), पालघर (३१९), ठाणे (१,४३४), रायगड (१५०).

Web Title: 52.68 per cent vaccination in the state; About 14 thousand 883 employees benefited from the vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.