Join us

मुंबईत दिवसभरात आढळले ५२९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:08 AM

मुंबई : मुंबईत सोमवारी काेरोनाचे ५२९ रुग्ण आढळले, तर १९ मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ ...

मुंबई : मुंबईत सोमवारी काेरोनाचे ५२९ रुग्ण आढळले, तर १९ मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख १७ हजार १०८ असून एकूण मृतांचा आकडा १५ हजार २०२ आहे. शहर उपनगरांत ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ६ लाख ८४ हजार १०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. ७ ते १३ जूनपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१० टक्के असल्याची नोंद आहे. शहर उपनगरांतील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ६७२ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत १५ हजार ५५० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पालिकेने दिवसभरात २० हजार १३३ चाचण्या केल्या असून आतापर्यंत ६६ लाख ४० हजार ६४१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहर उपनगरांतील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात २१ सक्रिय कंटेन्मेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ७० आहे. मागील २४ तासात पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील ५ हजार ३३० अति जोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.