राज्यात काेराेनाचे ५२ हजार ९०२ सक्रिय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:05 AM2021-01-01T04:05:17+5:302021-01-01T04:05:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात दिवसभरात ३,६१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण १८,२८,५४६ इतक्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात ३,६१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण १८,२८,५४६ इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के झाले आहे. वर्षअखेरीस राज्यात ५२ हजार ९०२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात गुरुवारी ३,५०९ नवीन रुग्णांचे निदान झाले आणि ५८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी बाधितांची संख्या १९,३२,११२, तर मृतांची एकूण संख्या ४९ हजार ५२१ झाली आहे.
सध्या मृत्युदर २.५६ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२७,४७,६३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,३२,११२ (१५.१६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले. सध्या २,८१,३०३ व्यक्ती घरगुती, तर ३,५७८ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
.........................