Join us

राज्यात ५२,९०२ सक्रिय रुग्ण; मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३६४ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 11:59 PM

राज्यात गुरुवारी ३,५०९ नवीन रुग्णांचे निदान झाले आणि ५८ मृत्यूंची नोंद झाली.

मुंबई : राज्यात दिवसभरात ३,६१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण १८,२८,५४६ इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के झाले आहे. वर्षअखेरीस राज्यात ५२ हजार ९०२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात गुरुवारी ३,५०९ नवीन रुग्णांचे निदान झाले आणि ५८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी बाधितांची संख्या १९,३२,११२, तर मृतांची एकूण संख्या ४९ हजार ५२१ झाली आहे.सध्या मृत्युदर २.५६ टक्के आहे. 

मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३६४ दिवसांवरमुंबईत २ लाख ७३ हजार ४४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण दुपटीचा काळ ३६४ दिवसांवर आहे. सध्या ८,०१४ सक्रिय रुग्ण आहेत. गुरुवारी ७१४ रुग्ण, ९ मृत्यूंची नोंद झाली. 

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई