प्रबोधन गोरेगावचा 52 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

By मनोहर कुंभेजकर | Published: April 9, 2024 05:52 PM2024-04-09T17:52:21+5:302024-04-09T17:52:36+5:30

प्रबोधन गोरेगांव संचलित मीनाताई ठाकरे रक्तपेढीतील डॉक्टर ,तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी कौतुक केलं आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला .

52nd anniversary of Prabodhan Goregaon celebrated with enthusiasm | प्रबोधन गोरेगावचा 52 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

प्रबोधन गोरेगावचा 52 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

मुंबई-प्रबोधन गोरेगावचा 52 वा वर्धापन दिन गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला गोरगाव पश्चिम,सिद्धार्थ नगर येथील प्रबोधन क्रीडा संकुलात उत्साहात पार पडला . प्रसाद महाडकर यांच्या संकल्पनेतून ' सूर तेचि छेडीता ' हा मराठी हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम जीवनगाणी च्या टीमने सादर केला होता. प्रबोधन गोरेगावच्या सभासदांनी आणि मान्यवरांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. 

प्रबोधन गोरेगांव संचलित मीनाताई ठाकरे रक्तपेढीतील डॉक्टर ,तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी कौतुक केलं आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला .

यावेळी संस्थापक सुभाष देसाई , उपाध्यक्ष सतीश वाघ , समीर देसाई आणि इतर मान्यवरांची उपस्थिती  होती.

अशी झाली प्रबोधन गोरेगावची स्थापना

१९७२ साली नव्याने आकार घेणाऱ्या गोरेगाव या उपनगराला स्वतःचा असा वेगळा चेहरा असावा अशा इच्छेने काही तरुण धडपडत होते.एखादी संस्था स्थापन करुन कामाला सुरुवात करण्यास ते तरुण सज्ज झाले.नेमक्या कोणत्या दिशेने काम करावे याबद्दल मार्गदर्शन मिळावं म्हणून गोरेगावकर तरुण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटले.बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, संस्था स्थापन करुन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम करत राहू नका तर समाजात अनेक गोष्टी दुर्लक्षित राहिल्या आहेत, त्याकडे लक्ष द्या.असं काम करा की जे दुस-या कोणी केलं नसेल.ज्या कामाकडे कुणी पाहिलंही नसेल.

बाळासाहेबांचा प्रेरणादायी विचारांप्रमाणे तरुणांनी कामाला सुरुवात केली.१९७२ मध्ये दि,१६ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी प्रबोधन गोरेगावची स्थापना केली.
 

Web Title: 52nd anniversary of Prabodhan Goregaon celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई