श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: निवडणुकीत उमेदवाराकडून मतदारांना दारूचे प्रलोभन दाखवले जाते. कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी छुप्या दारू पार्ट्या केल्या जातात. त्यासाठी दलालांकडून अवैद्य दारूचा बंदोबस्त केला जातो. मागील चार निवडणुकीत अवैध दारूच्या धंद्यात प्रचंड वाढ आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने १८ हजार ४०७ गुन्हे दाखल केले असून ५३ कोटी २२ लाख रुपये किमतीची दारू पकडली आहे.
निवडणूक, एकूण गुन्हे, दाखल गुन्हे, अटक आरोपी, जप्त दारू, नष्ट केलेली दारू किंमत (कोटी)
- लोकसभा २०१४ ७,८३० ३,८७५ ३,०९८ २,३६,०९१ २६,२९,३२८ १०.१४
- विधानसभा २०१४ ६,२०८ ३,४९३ ३,५४२ २,५७,६४४ २३,७४,०९२ ९.५९
- लोकसभा २०१९ ९,७७९ ६,८३५ ६,८०७ ३,३८,९७० ३०,९२,३०३ २०.१२
- विधानसभा २०१९ ६,११७ ४,२०४ ४,३५१ २,०६,२७३ १,६८,६७,९८१ १३.३७
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैध मद्य वाहतूक, विक्रीसंदर्भातील जवळपास ४ हजार २५५ गुन्हे दाखल झाले आहेत. ३,७५४ आरोपींना अटक केली आहे. या सर्व कारवाईत ७ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१ कोटी ६८ लाख लि. दारू नष्ट २०१४ च्या निवडणुकीत ७,८३० एकूण गुन्हे होते. २६,२९,३२८ लि. दारू नष्ट करण्यात आली. विधानसभा २०१४ व लोकसभा २०१९ निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत १,६८,३७,९८१ लिटर दारू नष्ट केली. ४१ जणांवर अमली पदार्थ विरोधी कायदा (एमपीडीए)अंतर्गत कारवाई करण्यात आली.
पराज्यातून मद्याची छुप्या मार्गाने राज्यात वाहतूक केल्याच्या विविध गुन्ह्यांत १,१६६ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६३ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.