मुंबई : मुंबई पुणे नागपूर , नाशिक औरंगाबाद, मुंबई या सहा विभागातून तब्ब्ल १ लाख १३ हजार विद्यार्थ्यांंनी अकरावी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. एकूण ५१ टक्के विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. तर, ४९ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. यामध्ये सगळ्यात जास्त विद्या$$र्थी हे मुंबई विभागातील असून त्याची टक्केवारी ५३ टक्के इतकी आहे. त्याखालोखाल पुणे आणि नाशिक येथे विद्यार्थ्यानी अकरावी ऐवजी दुसऱ्या कोर्सेस किंवा प्रवेशाना पसंती दिली आहे.१२ जुलै रोजी अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली. त्यासाठी अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई या सहा विभागातून २ लाख ३४ हजार ३५१ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले. मंगळवारी महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करण्याची शेवटची संधी विद्यार्थ्यांना होती. त्यानंतर संध्याकाळी उपसांचालक कार्यालयाकडे उपलब्ध माहितीनुसार एकूण १ लाख १९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यामध्ये एकूण १८४ प्रवेश रद्द झाले असून ५७० विद्यार्थ्यांना योग्य कागदपत्रांच्या अभावी प्रवेश नाकारले आहेत. १ लाख १३ हजार ७९४ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जागा अलॉट होऊनही ते प्रवेशासाठी पोहचले नसल्याची माहिती आहे.मुंबई विभागात सगळ्यात जास्त नॉट रिपोर्टेड विद्यार्थी असून पुण्यातील नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांची संख्या ४५. १२ टक्के आहे. अमरावतीमधील नॉट रिपोर्टेड विद्यार्थी ३९. २७ टक्के, औरंगाबाद - ३३. २१ टक्के, नागपूर- ३५. २० टक्के, नाशिक- ४४. ७७ टक्के विद्यार्थी नॉट रिपोर्टेड आहेत. पहिल्या फेरीच्या शेवटी अमरावती विभागातून ६०.६५ टक्के, औरंगाबाद विभागातून ६६. ६६ टक्के , मुंबई विभागातून ४५. ८४ टक्के , नागपूर विभागातून ६४. ६० टक्के , नाशिक विभागातून ५५. ०३ टक्के तर पुणे विभागातून ५४. ५५ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत.विद्यार्थ्यांना अर्जात बदल करण्याची संधीअकरावी प्रवेशाच्या दुसºया फेरीसाठी विद्यार्थ्यांना अर्जात बदल करण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी संधी मिळणार आहे. १७ आणि १८ जुलै रोजी उपसंचालक कार्यालयाकडून यासाठी लिंक ओपन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी या कालावधीत आवश्यक ते बदल करण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे.>क्षेत्र एकूण अलॉट जागा एकूण निश्चित प्रवेश रद्द प्रवेश नाकारण्यात आलेले नॉट रिपोर्टेडअमरावती ५९२५ ३५९४ २ २ २३२७औरंगाबाद ११,१९४ ७४६२ ५ ९ ३७१८मुंबई १,३४,४६७ ६१,६४५ ८८ ३७३ ७२,३६१नागपूर १९,२१९ १२,४१६ १६ २१ ६७६६नाशिक १४,८४५ ८,१७० २ २६ ६,६४७पुणे ४८,७०१ २६,५१६ ७१ १३९ २१,९७५
अकरावी प्रवेशाकडे ५३ टक्के विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 5:56 AM