मुंबई : राज्यात ४,७८० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ६२ लाख ३१ हजार ९९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के झाले आहे.
राज्यात रविवारी ४,१४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १४५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.११ % आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२२,९२,१३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२.२९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३,१२,१५१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर २,५२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,२४,६५१ झाली असून मृतांचा आकडा १ लाख ३५ हजार ९६२ आहे.
दिवसभरात नोंद झालेल्या १४५ मृत्यूंमध्ये मुंबई १, नवी मुंबई मनपा २, वसई-विरार मनपा १, पनवेल मनपा २, जळगाव २, पुणे ३२, पुणे मनपा २, सोलापूर ११, सातारा ४५, कोल्हापूर ४, सांगली १४, सांगली-मिरज-कुपवाड मनपा ३, सिंधुदुर्ग ५, रत्नागिरी ४, परभणी ३, परभणी मनपा १, लातूर मनपा १, उस्मानाबाद १ , बीड २, नांदेड १, नागपूर मनपा १ इ रुग्णांचा समावेश आहे.