लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य पोलीस दलात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या ५३९ पोलीस उपनिरीक्षकांना साहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयातून बुधवारी सायंकाळी त्यांच्या बढत्यांचे आदेश जारी करण्यात आले.
पोलीस दलातील अन्य दर्जाच्या पदोन्नती झाल्या असल्या तरी पीएसआयच्या मात्र विविध कारणांमुळे लांबल्या होत्या. सुमारे दहा वर्षांपूर्वी भरती झालेले हे अधिकारी आहेत. बढतीसाठी पात्र असूनही मुख्यालयातून आदेश जारी होत नव्हते, त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पदाेन्नतीचा निर्णय आणखी लांबविला जाईल, अशी भीती या उपनिरीक्षकांमधून व्यक्त होत होती. मात्र बुधवारी ५३९ उपनिरीक्षकांच्या बढतीचे आदेश जारी केल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.
................................