मुंबई : लॉकडाऊनच्या काळात बेस्ट अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देत आहे. या वेळी बेस्टने आपली हद्द पार केली असून, मुंबईसह विरार ते आसनगावपर्यंत आपली वाहतूक सेवा देत आहे. परंतु, कर्मचाºयांची गैरसोय होऊ नये यासाठी जीव धोक्यात घालून बेस्टचे कर्मचारी सेवा देत आहेत. याच कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे ५४ कर्मचाºयांचा मृत्यू झाल्याची माहिती बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिली आहे.
कोरोनाबाधित बेस्ट कर्मचाºयांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा तपशील जाहीर करावा. बेस्टचे ५४ कर्मचारी मृत झालेले असतानाही ती माहिती लपविली जात आहे. या सर्वाचा योग्य तपशील जाहीर करावा, संबंधितांच्या कायदेशीर वारसांना जाहीर केल्याप्रमाणे ताबडतोब उपक्रमाच्या सेवेत घेण्यात यावे, ५० लाख रुपये विमा कवच सुरक्षा देण्यात यावी़, शिस्तभंगाच्या कारवाया थांबविण्यात याव्यात, प्रत्येक आगारात वैद्यकीय तपासणी केंद्र सुरू करावे़ वडाळा आगार आणि वाहतूक प्रशिक्षण केंद्र तसेच दिंडोशी इथे तात्पुरत्या स्वरूपाचे कोरोना रुग्णालय उभारावे, अशा मागण्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने प्रशासनाकडे केल्या आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाशी दोन हात करणाºया अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे.बेस्टच्या कर्मचाºयांची मूक निदर्शनेबेस्टकडून मृत कर्मचाºयांची संख्या लपविली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. बेस्ट कर्मचाºयांच्या आरोग्याशी संबंधित विविध मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी ११ जून ते १३ जूनपर्यंत आगार व आस्थापनावर मूक निदर्शने केली जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.