मुंबई : तलाव क्षेत्रात पावसाचे पाणी दररोज वाढल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये २१ हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे. तसेच मोडक सागर, मध्य वैतरणा आणि भातसा तलावामध्ये आता ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा जमा झाला आहे.मुंबईत ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र जून, जुलै महिना कोरडा गेल्यानंतर मुंबईची मदार आता उर्वरित दोन महिन्यांवर आहे. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. सध्या सात लाख ७२ हजार जलसाठा जमा झाला आहे.जलसाठ्याची आकडेवारीतलाव कमाल किमान उपयुक्तसाठा सध्या(दशलक्ष)मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ७८६७१ १५६.८४तानसा १२८.६३ ११८.८७ ७४२६४ १२४.५८विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.२५तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.२४अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ ८०१२२ ५९८.६३भातसा १४२.०७ १०४.९० ३९५३०० १२८.८९मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १०८२५४ २६९.५३११ आॅगस्ट रोजी तलावांमध्ये जलसाठावर्ष जलसाठा टक्के(दशलक्ष लीटर)२०२० ७७२३५५ ५३.३६२०१९ १३२०१७९ ९१.२१२०१८ १२५१२१६ ८६.४५
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ५४ टक्के जलसाठा जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 4:48 AM