राज्यात ५४ हजार १७९ रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:13 AM2021-01-13T04:13:24+5:302021-01-13T04:13:24+5:30

मुंबई : राज्यात दिवसभरात २ हजार ३०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत १८ लाख ६३ हजार ...

54 thousand 179 patients under treatment in the state | राज्यात ५४ हजार १७९ रुग्ण उपचाराधीन

राज्यात ५४ हजार १७९ रुग्ण उपचाराधीन

Next

मुंबई : राज्यात दिवसभरात २ हजार ३०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत १८ लाख ६३ हजार ७०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६५ टक्के झाले आहे. सध्या राज्यात ५४ हजार १७९ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात रविवारी ३ हजार ५५८ रुग्ण आणि ३४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ लाख ६९ हजार ११४ झाली असून, बळींचा आकडा ५० हजार ६१ वर पोहोचला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ३४ मृत्यूंपैकी २९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ३४ मृत्यूंमध्ये मुंबई ५, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा २, कल्याण-डोंबिवली मनपा १, मीरा-भाईंदर मनपा २, नाशिक १, अहदमनगर मनपा १, जळगाव १, नंदूरबार १, पुणे १, पुणे मनपा ४, पिंपरी-चिंचवड मनपा २, सोलापूर मनपा १, सातारा १, बीड १, नांदेड १, नागपूर मनपा ७ या रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३४ लाख १ हजार १७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.६९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ३४ हजार ८४५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २ हजार ४५३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

Web Title: 54 thousand 179 patients under treatment in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.