85 वाले 54 हजार, शंभर प्लसचे तीन हजार! मुंबईतील मतदारांमध्ये ज्येष्ठांची संख्या लक्षणीय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:11 PM2024-10-19T14:11:31+5:302024-10-19T14:12:15+5:30

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून, निवडणूक विभागाकडून जय्यत तयारी सुरू आहे.

54 thousand of 85, three thousand of one hundred plus The number of senior citizens in Mumbai voters is significant | 85 वाले 54 हजार, शंभर प्लसचे तीन हजार! मुंबईतील मतदारांमध्ये ज्येष्ठांची संख्या लक्षणीय

85 वाले 54 हजार, शंभर प्लसचे तीन हजार! मुंबईतील मतदारांमध्ये ज्येष्ठांची संख्या लक्षणीय

मुंबई : मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक मतदारांची संख्या ५४,०६० इतकी असून, वयाची शंभरी पार केलेले मतदार २९८० आहेत. शंभरी पार केलेले सर्वाधिक मतदार मुंबादेवी मतदारसंघात ५५८ एवढे असून, सर्वात वृद्ध ११० वर्षांवरील एकमेव मतदार मलबार हिल मतदारसंघात असल्याचे निवडणूक विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून, निवडणूक विभागाकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्यातही मुंबईतील ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. मुंबई शहरातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विधानसभा मतदारसंघात ८५ वयोगटावरील ५४,०६० ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत. यात २५,९०९ पुरुष मतदारांचा, तर २८,१५० महिला ज्येष्ठ नागरिक मतदारांचा समावेश आहे. त्यात १०० वर्षांवरील पुरुष मतदार १५१०, तर महिला मतदारांची संख्या १४६९ एवढी आहे.

८५ ते १२० वर्ष वयोगटातील एकूण मतदार
मतदारसंघ     पुरुष     महिला     अन्य     एकूण
धारावी     ८३०    ७०२     ०     १५३२
सायन कोळीवाडा     १३७५    १४३६    १    २८१२
वडाळा     १७१०    २०३२    ०    ३७४२
माहीम    ३३२३    ३८४०    ०    ७१६३
वरळी    १५५७    १७१४    ०    ३२७१
शिवडी    २३३३    २४९२    ०    ४८२५
भायखळा    २७२४    २७७०    ०    ५४९४
मलबार हिल    ५०६३    ५८०३    ०    १०८६६
मुंबादेवी    ३३५८    ३४३५    ०    ६७९३
कुलाबा    ३६३६    ३९२६    ०    ७५६२
एकूण    २५९०९    २८१५०    १     ५४०६०

मुंबादेवीत शतकोत्तरी मतदार सर्वाधिक
१०० वर्षांवरील सर्वाधिक मतदार मुंबादेवी मतदारसंघात ५५८ एवढे असून, त्याखालोखाल कुलाबा मतदारसंघात ५२५ मतदार, मलबार हिल ४५०, भायखळा ३८४, माहीम ३४८, शिवडी २४७, सायन कोळीवाडा १६७, वडाळा १६५, वरळी १३० आणि धारावीमध्ये ६ मतदारांची नोंद आहे.
 

Web Title: 54 thousand of 85, three thousand of one hundred plus The number of senior citizens in Mumbai voters is significant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.