मुंबई : मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक मतदारांची संख्या ५४,०६० इतकी असून, वयाची शंभरी पार केलेले मतदार २९८० आहेत. शंभरी पार केलेले सर्वाधिक मतदार मुंबादेवी मतदारसंघात ५५८ एवढे असून, सर्वात वृद्ध ११० वर्षांवरील एकमेव मतदार मलबार हिल मतदारसंघात असल्याचे निवडणूक विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून, निवडणूक विभागाकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्यातही मुंबईतील ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. मुंबई शहरातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विधानसभा मतदारसंघात ८५ वयोगटावरील ५४,०६० ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत. यात २५,९०९ पुरुष मतदारांचा, तर २८,१५० महिला ज्येष्ठ नागरिक मतदारांचा समावेश आहे. त्यात १०० वर्षांवरील पुरुष मतदार १५१०, तर महिला मतदारांची संख्या १४६९ एवढी आहे.
८५ ते १२० वर्ष वयोगटातील एकूण मतदारमतदारसंघ पुरुष महिला अन्य एकूणधारावी ८३० ७०२ ० १५३२सायन कोळीवाडा १३७५ १४३६ १ २८१२वडाळा १७१० २०३२ ० ३७४२माहीम ३३२३ ३८४० ० ७१६३वरळी १५५७ १७१४ ० ३२७१शिवडी २३३३ २४९२ ० ४८२५भायखळा २७२४ २७७० ० ५४९४मलबार हिल ५०६३ ५८०३ ० १०८६६मुंबादेवी ३३५८ ३४३५ ० ६७९३कुलाबा ३६३६ ३९२६ ० ७५६२एकूण २५९०९ २८१५० १ ५४०६०
मुंबादेवीत शतकोत्तरी मतदार सर्वाधिक१०० वर्षांवरील सर्वाधिक मतदार मुंबादेवी मतदारसंघात ५५८ एवढे असून, त्याखालोखाल कुलाबा मतदारसंघात ५२५ मतदार, मलबार हिल ४५०, भायखळा ३८४, माहीम ३४८, शिवडी २४७, सायन कोळीवाडा १६७, वडाळा १६५, वरळी १३० आणि धारावीमध्ये ६ मतदारांची नोंद आहे.