Join us

इंग्रजीवरून हिणवल्याच्या रागात मित्रावर केले तब्बल ५४ वार, धारावीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:56 PM

‘इंग्रजीत बोलता येत नाही.. अशिक्षित आहेस,’ असे चिडवले म्हणून मित्रानेच मित्रावर चाकूने तब्बल ५४ वार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी रात्री धारावीत घडली. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी मोहम्मद अमीर अब्दुल वहिद रहीन (२१) या तरुणाला हत्येचा गुन्ह्यात अटक केली आहे.

मुंबई : ‘इंग्रजीत बोलता येत नाही.. अशिक्षित आहेस,’ असे चिडवले म्हणून मित्रानेच मित्रावर चाकूने तब्बल ५४ वार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी रात्री धारावीत घडली. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी मोहम्मद अमीर अब्दुल वहिद रहीन (२१) या तरुणाला हत्येचा गुन्ह्यात अटक केली आहे.धारावीच्या आझादनगर परिसरात अमीर हा कुटुंबीयांसोबत राहतो. तो गारमेंटमध्ये नोकरी करतो. त्याच्याच शेजारी मोहम्मद अफरोज आलम शेख (१८) राहायचा. दोन वर्षांपासून दोघांमध्ये मैत्री होती. दोघांनीही दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरला होता. मात्र अमीरला घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे दहावीची परीक्षा देणे शक्य झाले नाही. याचे त्याला दु:ख होते. त्यातच शेखचे इंग्रजी चांगले असल्याने, तो त्याला सतत इंग्रजी भाषा येत नाही म्हणून टोमणे मारत असे. त्याच्या अशिक्षितपणावरून चिडवत असे. यावरून दोघांमध्ये खटके उडायचे. अमीरने त्याला अनेकदा समजावले. तरीही शेख त्याला चिडवत होता.त्यामुळे अमीरने त्याचा काटा काढायचे ठरवले. दोन दिवसांपासून तो त्याच्या हत्येचा कट आखत होता. त्याने बाजारातून रामपुरी चाकू खरेदी केला. बुधवारी रात्री त्याने शेखसोबत फिरून, दारू पिण्याचा बेत आखला. दोघेही वांद्रेत फिरून त्यानंतर धारावीतील रहेजा पुलाखाली दारू पिण्यासाठी बसले. अमीर दारू पिण्याचे नाटक करत होता. मद्यधुंद शेख नैसर्गिक विधीसाठी थोडा दूर गेला. त्या वेळी अमीरने त्याच्याकडील चाकूने शेखच्या पाठीमागून मानेवर वार केले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने शेखवर तब्बल ५४ वार केले.अधिक तपास सुरूभानावर येताच, त्याने रक्ताने माखलेल्या चाकूसह शाहूनगर पोलीस ठाणे गाठले. मित्राची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्यासह घटनास्थळ गाठले. तेथून शेखला ताब्यात घेत सायन रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी अमीरला अटक केली आहे. शेखच्या हत्येमागे चिडविण्याशिवाय अन्य काही कारण आहे का, याचा तपास सुरू असल्याची माहिती शाहूनगर पोलिसांनी दिली.

टॅग्स :गुन्हा